पोलीसवाला ऑनलाईन मीडिया
पनवेल , दि. १८ :- पनवेल तालुक्यातील वाकडी येथे राहणारे क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष डी. के. भोपी यांच्या घरावर गुरूवारी रात्री गावातीलच काही व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
तलवार, चॉपर, हाँकी स्टीक यासारखी धारदार शस्त्रे हल्लेखोरांकडे होती. तीन सदस्यांवर तलवारीने वार करण्यात आले आहेत. तर त्यांचे भाऊ दीपक किसन भोपी यांच्या गर्भवती पत्नीच्या पोटाला देखील दुखापत करण्यात आली आहे.
याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दीपक किसन भोपी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, रात्री जेवण करुन झोपलो असता अचानक रात्री 10.45 वाजताच्या दरम्यान ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा रुमचा दरवाजा उघडला असता धनंजय पाटील, अरुण पाटील, गणेश पाटील, मंगेश पाटील, संदीप पाटील, गोटीराम पाटील, अक्षय पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, कचेर पाटील, नरेश पाटील, मनेश पाटील, सुरज पाटील हे सर्वजण माझ्या भावाचा मुलगा प्रेम भोपी याला घरासमोर हातात स्टंप, हॉकी स्टीक, तलवार व चॉपरने मारहाण करीत होते. त्यावेळी माझा चुलत भाऊ विनोद भोपी, सुरेखा भोपी, मोहन भोपी, सुरेश भोपी, मोहन भोपी, सुकेश भोपी, प्रतिभा भोपा, प्रेरणा भोपी, सुमित पाटील हे सर्वजण मदतीकरीता आले.जखमींवर एमजीएम हॉस्पीटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत. धनंजय नरेश पाटील, अरुण नरेश पाटील, गणेश आत्माराम पाटील, मंगेश कचेर पाटील, संदीप कचेर पाटील, गोटीराम आत्माराम पाटील, अक्षय गोटीराम पाटील, आकाश गोटीराम पाटील, अविनाश गोटीराम पाटील, मनेश नरेश पाटील, कचेर आत्माराम पाटील, नरेश आत्माराम पाटील, सुरज संतोष पाटील सर्व राहणार वाकडी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे माझे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. आम्हाला जीवे ठार मारण्यासाठीच हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. धारधार शस्त्रांसह झालेल्या हल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. असेे क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष डि. के. भोपी यांनी सांगितले.