Home महत्वाची बातमी मातंग समाजाच्या अत्याचार प्रकरणाकडे लक्ष घालणार – राज ठाकरे

मातंग समाजाच्या अत्याचार प्रकरणाकडे लक्ष घालणार – राज ठाकरे

162

साठे युवा मंचचे राज ठाकरे याना निवेदन.

रवि गायकवाड

सिल्लोड , दि. १६ :- गेल्या अनेक वर्षा असून राज्यातील अल्पसंख्याक हिंदू मातंग समाजाच्या महिला, पुरुष, युवतीचे खून, बलात्कार , मारहाण अशा अत्याचाराचा घटना वाढत चाललेल्या असून मातंग समाज असुरक्षित झाला आहे. राज्यातील अकोला, नांदेड, जालना, औरंगाबाद आदीसह इतर जिल्ह्यात समाजाच्या महिला, पुरुषावर अन्याय अत्याचार करीत खून करण्यात आले आहे. मातंग समाजाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.

या संदर्भात विश्वसाहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने म्हणून डाँ सचिन साबळे यांच्या नेतुत्वा खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे याना राज्यातील हिंदू मातंग समाजाच्या अन्याय अत्याचार प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष देण्याची मागणीचे निवेदन औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गुह येथे देण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष घालनार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
या निवेदनावर डॉ.सचिन साबळे दौलतराव सिरसाट , प्रा.अनिल साबळे , गजानन आव्हाड, सीताराम कांबळे , सचिन आव्हाड, विजय आव्हाड , सौ. अंजली साबळे, राधा यंगड, स्नेहल साबळे, लताबाई सोनवने, दादाराव सिरसाट , अनिल सोळसे, संतोष थोरात मनोज गायकवाड आदीसह पदाधीकार्याच्या स्वक्षर्या आहेत.