Home मराठवाडा घनसावंगीचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्या बदलीमुळे….. ‘कही खुशी कही गम’.

घनसावंगीचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्या बदलीमुळे….. ‘कही खुशी कही गम’.

384

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगीजालना , दि. १६ :- जिल्ह्यातील घनसावंगी तहसीलचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे झाली. गुरूवारी महसुल व वनविभागाचे उपसचिव डॉ.माधव वीर यांचे बदलीचे पत्र प्राप्त झाले आहे.यापुर्वी श्री शेळके यांनी पैठण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली होती.घनसावंगीचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्या बदलीच्या बातम्या सध्या सर्वत्र झळकत आहेत. त्यांच्या बदलीमुळे सर्वसामान्य माणूस दुखावला आहे. तर अवैध धंदे वाले सुखावले आहेत. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात जबरदस्त कामगिरी बजावलीआहे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळवून देणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नैसर्गिक आपत्तीत सहाय्य करणे या लोकहीताच्या कामांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्राधान्य दिले. निवडणूका असोत शेतकरी, निराधार जनतेची कामे असोत तत्परतेने ते करत असत सर्वसामान्य जनतेचा कर्तव्यदक्ष, कदरदान अधिकारी म्हणून त्यांची जेवढी ख्याती होती तेवढेच ते वाळू माफियांचे कर्दनकाळ बनले होते.तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची वाळू माफियांवर वचक निर्माण झाली होती.अलिकडच्या काळात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले होते.सदैव प्रसन्न मुद्रा आणि कर्तव्यतत्परतेमुळे ते लोकप्रिय बनले होते.गोड बोलून पाचर ठोकणारा अधिकारी म्हणूनही त्यांचा काही गटात दरारा होता, त्यामुळे अवैधरीत्या कमाई करणारे बदमाश लोक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना टरकून राहत असत . थोडक्यात सांगायचे झाले तर तहसीलदार शेळके यांच्या बदलीमुळे घनसावंगी तालुक्यात ‘ थोडी खुशी जादा गम ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेत अश्रृ ढाळले जात आहेत तर छुपे रुस्तुम पेढे वाटण्यासाठी पुढे येतील, यात नवल नाही.