Home महत्वाची बातमी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे आज हातुर्णा येथे रास्ता रोको व...

युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे आज हातुर्णा येथे रास्ता रोको व आत्मदहन आंदोलन

160

मनिष गुडधे

अमरावती , दि. १५ :- गेल्या कित्येक दिवसापासून लालखडी , कुंड , हातुर्णा , पांढरी या मार्गावर आर आय पी एल कंपनी च्या ट्रकची दिवस – रात्र अवैध वाहतूक सुरू होती.
परिसरातील नागरिक वाहतूक करत असताना आर आय पी एल कंपनीचे ट्रक ड्रायव्हर कुणालाही साइट देत नव्हते. एकतर ह्या मार्गावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहे आणि दुसरे म्हणजे ट्रक समोर जात असताना त्याची उडणारी धूळ त्यामुळे या मार्गावर रोज अपघात होत आहेत, आतापर्यंत या मार्गावर 58 अपघात झालेले आहे. त्यात बारा जणांचा मृत्यू झालेला आहे.


परिसरातील नागरिकांनच्या मनात संताप निर्माण झाला असून या कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यासाठी सरपंच ( हातुर्णा ) आणि सरपंच ( कुंड सर्जपुर) यांनी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र कडे तक्रारी अर्ज दाखल केले.
या तक्रारी अर्जावर युवा लॉयन्स ग्रुपने जिल्हाधिकारी साहेब , पोलीस आयुक्त अमरावती शहर , तहसीलदार अमरावती, तहसीलदार भातकुली , आणि वाहतूक विभाग यांना पत्र दिले. पण पंधरा दिवस होऊन सुद्धा या पत्रावर कुठलीही कारवाई न करता फक्त आश्वासन देण्यात आले.
१० -०२ – २०२० रोजी परत या सर्वांना पत्र देऊन १४-०२-२०२० रोजी रास्ता रोको व आत्मदहन आंदोलन करण्यात येईल , याची परवानगी घेतली.
त्यावर आज आर आय पी एल कंपनी च्या सर्व संपूर्ण ट्रक अडवून व संबंधित अधिकारी सोबत घेऊन. आर आय पी एल कंपनी च्या ओवरलोड ट्रकवर तब्बल 20 लाख रुपयांचा दंड ठोकण्यात आला.
खराब झालेला लालखडी,कुंड, हा, पांढरी, हा रस्ता आर आय पी एल कंपनीकडून पुन्हा दुरुस्त करून घेतल्या जाईल. व शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान, आणि अपघातग्रस्तांना सुद्धा मदत केल्या जाईन अशे आश्वासन बंधित अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहे.