Home रायगड सनातन संस्था रायगड तर्फे व्हॅलेन्टाइन डे निमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रवचन

सनातन संस्था रायगड तर्फे व्हॅलेन्टाइन डे निमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रवचन

132

गिरीश भोपी

आवरे , दि. १५ :- हिंदू संस्कृति ही प्राचीन असली तरी जागतिक स्तरावर हिन्दू संस्कृति कशी महान आहे है भारतीय तत्व ज्ञानि संपूर्ण जगाला समजावून सांगितले आहे.आज जग हे भारतीय संस्कृती चे अनुकरण कसे करत आहे. आपल्याला पुरातन काळापासून मिळालेल्या ज्ञानाचा वापर व आपण आपल्या सणांना किती महत्व देतो हे आपण आत्मपरीक्षण करायला हवं. उगाचच नवीन येऊ घातलेले valentine डे सारख्या डे संस्कृतीला आपल्या देशात आपण अनन्यसाधारण महत्व देत आहोत. भारतीय संस्कृती आणि हा दिवस याचा काहीही संबंध नाही याची भावना मनात ठेवायला पाहिजे.तसेच ह्या डे संस्कृतीच्या विळख्यातून तरूण पिढीचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने सनातन संस्था प्रवचनाच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे करत आहे. सनातन संस्था रायगड च्या वतीने सुयश क्लासेस आवरे येथे आज
सनातन संस्था रायगड च्या वतीने सदर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.वर्षा योगेश ठाकूर यांनी प्रवचन घेतले. सदर प्रवचनाच्या माध्यमातूनभारतीय संस्कृतीचे महत्व सांगितले. सनातन चे साधक योगेश ठाकूर सर हे ही उपस्थित होते . उपस्थिती २५विद्यार्थी व १ शिक्षक सदर व्याख्यान ला चांगला प्रतिसाद सुयश क्लासेस आवरे तर्फे मिळाला .