हिंगोली , दि. १४ : ( राजेश भांगे ) हिंगोली जिल्ह्यात सिंचनासाठी ३८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे त्याचा लाभ सिंचनासाठी होणार असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी गुरुवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.
येथील भाजपच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. जून २०१९ मध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्ह्याच्या सिंचन अनुषेश भरून काढण्यासंदर्भात निवेदन देऊन शंभर कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे श्री. मुटकुळे यांनी सांगितले.