विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार मोरवाही येथिल घटना

प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपूर , दि. १४ :- शेतात लाख खोदणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. महिलेचे नाव सरिता पाल वय 32 राहणार मोरवाही येथिल रहिवासी आहे. सकाळी लाख खोदणी करायला आपल्याच शेतात गेली असता दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने काम करीत असलेल्या सरिता पाल या महिलेवर हल्ला करून ठार केले. सरिता पाल हिला 7 वर्षाची मुलगी व 11 वर्षाचा मुलगा असे दोन लहान मुले आहेत. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत आहे.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752