Home विदर्भ अवैधरित्या वाहतुक होणारा प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु जप्त अन्न व औषध...

अवैधरित्या वाहतुक होणारा प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु जप्त अन्न व औषध तसेच स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

235

रवि माळवीयवतमाळ , दि. १४ :- प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु भरुन नागपूर मार्गे येणारा कंटेनर ट्रक पोलीसांनी कळंब ते नागपूर हायवे मार्गावरील मौजा खुटाळा गावा जवळील काकाजीचा धाब्याजवळ अन्न औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेने पकडून ५१ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा माल जप्त केला. ही कारवाई दिनांक १३ फेब्रुवारी रोजी केली. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी गोपनिय माहीतीव्दारे नुरुल हसन, प्रभारी पोलीस अधीक्षक सो.यवतमाळ यांना गोपनिय माहिती मिळाली की नागपूर मार्गे एक कंटेनर ट्रक क्रमांक एचआर/३८/झेड/६२८२ मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला भरुन आणलेला असुन सदर ट्रक कळंब ते नागपूर हायवे मार्गावरील मौजा खुटाळा गावा जवळील काकाजीचा धाब्याचे बाजूला थांबलेला आहे. सदर माहिती प्राप्त हाताच प्रभारी पोलीस अधिक्षक सो.नुरुल हसन यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शखेचे पथक तयार करुन अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांना पाचारण केले व त्यांचेसह मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकास मौजा खुटाळा गावाजवळील काकाजीचा धाबा कडे रवाना केले. सदर पथकाने कंटेनर ट्रक क्रमांक एचआर/३८/झेड ६२८२ चा शोध घेवून त्याची झडती घेतली असता सदर ट्रक मधून राज निवास सुंगंधीत पान मसालाचे एकुण ८० बोरे प्रत्येक बोरीत २०४ नग पुडे असे एकुण १६ हजार ३२० पुडे, वजन १६३२ किलो व एनपी ०१ सुगंधीत तंबाखुचे एकुण २० बोरे प्रत्येक बोरीत ८१६ नग पुडे असे एकुण १६ हजार ३२० पुडे, वजन २१५.४२ किलो एकुण किंमत २६ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु व कंटेनर ट्रक किंमत अ.२५ लाख रुपयाचा असा एकुण ५१ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक नूरुल हसन सा. यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब विजय राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी, गोपाल माहोरे, संदीप सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, बंडु डांगे, हरिष राऊत, सुधिर पिदुरकर, महेश पांडे, गजानंद हरणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केली.