Home बुलडाणा मोठ्या भावाचा क्षुल्लक कारणावरुन लहान भावाने केला खून ,

मोठ्या भावाचा क्षुल्लक कारणावरुन लहान भावाने केला खून ,

236

 

अमिन शाह

बुलडाणा ,

खामगाव सुटाळा बु. येथील नागोबा मंदिराजवळील रहिवासी देविदास महादेव गायकी (२८) हा काल ५ मार्च २६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मद्यपान करून एका मित्रासोबत घरी आला होता. यावेळी लहान भाऊ मंगेश महादेव गायकी (२५) याने देविदासच्या मित्राला घरी जाण्यास सांगीतले. त्यामुळे देविदासला अतोनात राग आला होता. मित्राला घरी जाण्यास का सांगितले? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर देविदास याने मंगेशच्या डोक्यामध्ये हातातील कडे मारले होते. त्यामुळे चिडून मंगेशने घरामधुन भाजी कापण्याचा चाकु आणुन देविदासच्या डाव्या कुशीत व
पोटात मारून गंभीर जखमी केले होते. त्याला त्वरीत सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून देविदास गायकी याला मृत घोषीत केले. याप्रकरणी लिला महादेव गायकी यांनी शिवाजी नगर पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये उपरोक्त
आरोपीविरूध्द कलम १०३(१), ३५२ भान्यासं नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी मंगेश महादेव गायकी याला काल ५ मार्च २६ रोजी मध्यरात्री राहत्या घरून अटक केली असून आज न्यायालयासमोर उभे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास एपीआय मंदार पुरी करीत आहेत. घड़लेल्या खून प्रकरणा मुळे परिसरात खळबल उडाली आहे ,