
फुलचंद भगत
वाशिम:-अनेक वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी दिसत असुन मंगरुळपीर तालुक्यातील शासनाच्या विविध विभागात बदलीचे नियम धाब्यावर बसवलेले असल्याचे चिञ आहे.
बदलीनंतरही काहींना सेवा संलग्नतेच्या नावाखाली पुन्हा त्याच जागेवर आणण्यात येत असल्याने त्यांच्या बदल्या करतातच कशाला, असा सवाल इतर कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात शासनाने नियम केले आहेत. परंतु, लाडक्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून या बदल्यांच्या नियमांनाच तिलांजली देण्यात येत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील पोलिस विभाग,महसुलविभाग,पंचायतसमिती,नगरपरिषद,बांधकाम विभाग अशा विविध विभागात हा प्रकार सुरू आहे. लाडके कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी आहे. काही जणांची बदली झाली. परंतु, तीन-चार महिन्यात पुन्हा ते परत आले. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही जणांचे तर कामाचे टेबल सुद्धा बदलण्यात आले नसल्याची माहिती आहे.मंगरुळपीर तालुक्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी बदलीचे नियम बाजूला ठेवण्यात आले आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
*‘सेवा संलग्न’चा गैरवापर*
महत्वाच्या कामासाठी काही कर्मचाऱ्यांनी सेवा सलंग्नतेच्या नावाखाली मुख्यालयात आणण्यात येते. परंतु मर्जीतील कर्मचाऱ्यांची सेवा सलग्नतेचा कार्यकाळच संपत नाही. गेल्या अनेक वर्षापासून काही कर्मचारी कार्यरत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून इतरांच्या संबंधातील तक्रारी व इतर माहिती वरिष्ठांपर्यंत जाऊ देण्यात येत नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात इतरांमध्ये रोष असल्याचे सांगण्यात येते.












































