Home मराठवाडा धडक देऊन न फरार होणारे वाहन तात्काळ पकडले

धडक देऊन न फरार होणारे वाहन तात्काळ पकडले

108

नांदेड / देगलूर , दि. ११ :- ( राजेश भांगे ) देगलूर तालुक्यातील खानापुर फाट्यावर एका दुचाकिला महिंद्रा झायलो हे वाहन धडक देऊन फरार होत होते तेव्हा पोलिसांनी तात्काळ सक्रिय होवुन त्या वाहन चालकासह ताब्यात घेतले .
देगलूर तालुक्यातील बलूर येथील रहिवासी असलेले आकाश यादवराव राजुरे ( 28 ) हा तरूण मुखेड तालुक्यातील भगनुर येथील आपल्या सासरवाडि वरून परत येते असताना रविवारी दिनांक नऊ रोजी दुपारी चार च्या सुमारास त्याच्या दुचाकिला देगलूराहुन नांदेड कडे जाणाऱ्या महिंन्द्रा झायलो या suv वाहनाने धडक दिली . तरी या झायलो suv मोटारीचा क्रमांक MH 04 DY 1349 हे असुन या वाहनाने धडक दिल्यावर चालकाने वाहन घेवुन पळुन जाण्याच्या अनुशंगाने आपली गाडि तशीच भरधाव वेगात दामटविली हि माहिती रामतीर्थ पोलिसांना फोन वरून मिळाली असता रामतीर्थ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर एस घाडगे यांनी तात्काळ आपल्या सहकार्या सह झायलो गाडिचा पाठलाग केला आणि त्या चालकास वाहना सह ताब्यात घेऊन तत्परता दाखविली
धडक देणारे महिंन्द्रा झायलो हे वाहन रामतीर्थ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असुन दुचाकिस्वार आकाश राजुरे यांना उपचारासाठि देगलूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .