Home विदर्भ पत्रकार अमोल कंटाळे यांना शिवरत्न पुरस्कार जाहीर

पत्रकार अमोल कंटाळे यांना शिवरत्न पुरस्कार जाहीर

30
0

19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्य गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमात होणार पुरस्कार जाहीर

अमरावती / दर्यापुर , दि. ११ :- दर्यापुर शहरात अग्रेसर असलेले वृत्तपत्र दर्यापुर दर्पण चे संपादक तथा पावर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष युवा पत्रकार अमोल कंटाळे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या व जागतिक मराठी दिनानिमित्त आयोजित गौरव महाराष्ट्राचा आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शिवराज्य प्रतिष्ठाण पुणे,तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तसेच मानव विकास फाउंडेशनच्या वतीने गौरव महाराष्ट्रचा या कार्यक्रमात देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवरत्न पुरस्कार 2020 जाहीर झाल्याची माहिती मानवसेवा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकार अमोल कंटाळे यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केले आहे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांबाबद,तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे त्यांचा या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय शिवरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गौरव महाराष्ट्राच्या या जाहीर कार्यक्रमात त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अमोल कंटाळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलत असताना पुढील काळात सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व सामान्य गोर गरीब जनतेना न्याय मिळवून देण्याचे कार्य माझा लेखणीतून होणार या पुरस्कारामूळे मला सामाजिक कार्य करण्यास एक नवीन ऊर्जा व बळ मिळाल्याचे अमोल कंटाळे यांनी सांगितले.

Unlimited Reseller Hosting