अमीन शाह
गडचिरोली , दि. १० :- ऐककुलती एक मुलगी पळून गेल्या मूळे प्रचंड मानसिक धक्का बसल्या ने एकाच कुटुंबातील तिघांनी आज दुपारी वहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना आनंदनगर येथे घडली आहे .
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील आनंद नगर भागात रविंद्र वरनगटीवार , 52 हे आपल्या परिवारा सह भाड्याने राहत होते , त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती मुलगी कान्व्हेट शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होती ती अचानक शनिवार पासून आपल्या प्रियकरा सोबत निघून गेली होती याचा प्रचंड धक्का या कुटुंबाला बसला आज दुपारी आई वैशाली वरणगटीवार , 46 , मुलगा , साहिल 19 , वडील रविंद्र वरणगटीवर यांनी जवळच असलेल्या विहरित उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे , पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही , दरमियन घडलेल्या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे दुःख वयकत केले जात आहे .