Home बुलडाणा आमदार साहेब हे बरं नव्हं ??

आमदार साहेब हे बरं नव्हं ??

1165

आमदार साहेब हे बरं नव्हं ??

 

अमीन शाह

साखरखेर्डा , येथील ग्रामस्थ प्रवासी काही राजकीय कार्यकर्ते तिची आतुरतेने वाट पाहत होते मात्र ती आलीच नाही दोन दिवस लोकांनी तिची वाट पाहिली तरी सुद्धा ती आली नाही मात्र आज समजले की या मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी त्या गाडीला पत्र देऊन रोखले आहे ,

संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार बुलडाणा जिल्ह्याचे खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी फोन करून पत्र देऊन पिंपरी चिंचवड पुणे ते देऊळगाव कोळ ही बस साखरखेर्डा पर्यंत सुरू करा तिला साखरखेर्डा मुकामी ठेवा असे विभाग नियंत्रक पुणे यांच्याशी बोलले होते तसा एक विडिओ ही वायरल झालं होता त्या नंतर विभाग नियंत्रक पुणे यांनी सदर गाडी सुरू करण्या संदर्भात एक पत्र ही जारी केले होते दिनांक 5 जून पासून ही बस सुरू होणार होती सोशल मीडिया वर ही बस सुरू होणार अशी पोस्ट ही वायरल झाली होती त्या मुळे परिसरात आनंदाचे वातावरण होते परिसरातील प्रवासी राजकीय कार्यकर्ते दिनांक 6 7 ला या गाडीची वाट पाहत होते कार्यकर्त्यांनी हार फुले पेढे ही आणले होते वाहक चालक यांचा सत्कार ही होणार होता मात्र ही गाडी आलीच नाही ?काय झाले हे कोणालाच कळलं नाही मात्र आज एका वृत्त पत्रात आलेल्या बातमी वरून समजले की आमदार मनोज भाऊ नी या गाडीला एक पत्र देऊन रोखले आहे त्या मुळे परिसरात संताप वयकत केला जात आहे ,

आमदाराचा दुजाभाव ,

आज एका वृत्त पत्रात आलेल्या बातमी नुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी पत्र देऊन पुणे ते देऊळगाव कोळ ही बस साखरखेर्डा येथे सुरू करू नका जैसे थे तशीच सुरू राहू द्या असे पत्र विभाग नियंत्रक पुणे यांना दिल्याचे बातमीत आले आहे त्या मुळे साखरखेर्डा वासियात संतप्त प्रतिक्रिया वयकत केल्या जात आहे आमदार साहेब हे बरं नव्ह आमच्याशी असा दुजाभाव का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ,

गाडी महत्वाची ,

साखरखेर्डा परिसरातील अनेक लोक पुणे येथे कामा निमित्त पुण्याला जात असतात अनेक विध्यार्थी ही शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात त्या मुळे साखरखेर्डा येथून पुणे जाण्यासाठी बस सुरू होणे महत्वाचे आहे , राजकारण बाजूला ठेऊन ही पुणे येथे जाण्यासाठी दुसरी बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी साखरखेर्डा परिसरातील प्रवाशीयांनी केली आहे ,