Home बुलडाणा लालपरीसाठी देऊळगाव कोळ ग्रामस्थांचे आंदोलन गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा ,

लालपरीसाठी देऊळगाव कोळ ग्रामस्थांचे आंदोलन गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा ,

436

 

आ. कायंदे यांनी पत्र दिल्याने बससेवा कायम

अमीन शाह

साखरखेर्डा lप्रतिनिधी

तालुक्यातील देऊळगाव कोळ वासियांच्या मागणीची दखल घेत १ ऑगस्ट २०२२ रोजी पिंपरी चिंचवड ते देऊळगाव कोळ मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने सदर बस देऊळगाव कोळ बंद करून साखरखेर्डा मुक्कामी करण्याचा घाट बांधला होता. याबाबत माहिती मिळतात सदर बस देऊळगाव कोळ येथे प्रवासी सोडून साखरखेर्डा मुक्कामी जात असतानाच देऊळगाव कोळ ग्रामस्थांनी आंदोलन करून बस रोखली. शेवटी आ. मनोज कायंदे यांनी आगार व्यवस्थापक पुणे यांना पत्र दिल्याने ही बससेवा कायम सुरू राहणार आहे.
देऊळगाव कोळ आणि परिसरातील गावातील लोक दवाखाना तसेच इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर पुण्याला जातात.

देऊळगाव कोळ हे गाव आडवळणी असल्याने येथून जाण्यास बससेवा नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत होता. याची दखल घेत दत्ता भाऊ कायंदे यांनी पुणे येथील आ. महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून 2022 ला ही बस सेवा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून या ठिकाणाहून जाण्याची लोकांना व्यवस्था झाली होती. मात्र अचानक राजकीय दबाव टाकून सदर बससेवा ही देऊळगाव कोळ न करता साखरखेर्डा करावी, अशा सूचना केल्या होत्या.. त्यामुळे सदर बस प्रवाशांना सोडण्यासाठी देऊळगाव कोळ येथे गेली. त्यानंतर ती प्रवाशांना सोडून साखरखेर्डा मुक्कामी जात असतानाच गावातील जानकीराम कायंदे, नरहरी काळूशे शंकर
काळुशे, विशाल गायकवाड, विष्णू गायकवाड, शुभम काळुशे, नितीन काळुशे, भागवत काळुशे यांचे सह शेकडो गावकऱ्यांनी चक्क बससमोर आंदोलन करून बस रोकली. शेवटी बस वाहक चालकांने बस साखर खेर्डा येथे नेणार नसल्याचे सांगितल्याने तसेच आमदार मनोज कायंदे यांनी बससेवा पुन्हा आहे तशी सुरू ठेवावी, असे पत्र दिल्याने शेवटी बस सेवा पूर्ववत पिंपरी चिंचवड ते देऊळगाव कोळ करण्यात आल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सदर बस पिंपरी चिंचवड वरुन सकाळी ८.३० ला निघते आणि रात्री देऊळगाव कोळला ७.३० वाजता पोहचते आणि सकाळी देऊळगाव कोळ वरून ६.३० ला निघते आणि पिंपरी चिंचवडला दुपारी ४.३० वाजता पोहोचेल दरम्यान साखरखेर्डा येथून ही बससेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती तसे फोन कॉल केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांनी सबंधित आगार व्यवस्थापकांशी केल्यावर काही समर्थकांनी सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल केल्यावर प्रवाशांना आनंद व्यक्त झाला होता ,

तिर्व आंदोलनाचा इशारा ,

सध्या पुणे येथून देऊळगाव कोळ या गावी जी बस सुरू आहे ती पिंपरी चिंचवड डेपो ची आहे ती बस मी अथक परिश्रम घेऊन सुरू केलेली आहे साखरखेर्डा येथून पुणे येथे बस सुरू करायची असल्यास आमची बस न वळवता मेहकर किंवा चिखली डेपो ची बस सुरू करण्यात यावी झोटींगा , कंडारी ,खळेगाव , भंडारी , देऊळगाव कोळ या गावाला ही एकमेव गाडी आहे दर रोज जालना संभाजीनगर , पुणे जाणाऱ्या प्रवाश्यांनी ही गाडी फुल असते त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन आमच्या या गाडीला न वळवता दुसरी बस सुरू करण्यात यावी आमच्या गावात जाणाऱ्या या एकमेव गाडी ला वळवण्याचा प्रयत्न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने तिरव आंदोलन छेडण्यात येईल ,

दत्ता भाऊ कायंदे ,