Home बुलडाणा ष.ब्र.१०८ सदगुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिवस पशूंना चारा आणि अनाथांना साहित्य...

ष.ब्र.१०८ सदगुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिवस पशूंना चारा आणि अनाथांना साहित्य वाटप करून साजरा ,

527

ष.ब्र.१०८ सदगुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिवस पशूंना चारा आणि अनाथांना साहित्य वाटप करून साजरा ,

 

अयोध्या रामलल्लांच्या मंदिर समितीचे कार्याध्यक्ष गोविंदाचार्याची घेतली भेट ,

अमीन शाह

साखरखेर्डा lप्रतिनिधी – मानवतच्या मठपती कुटूंबियांचा पुजापाठाचा तसा परंपरागत वारसा. विरभद्र मठपती यांची बेताची परिस्थिती असल्याने सगळा रहाटगाडा याच भरवश्यावर. कापड दुकानात मुनीम म्हणून पोटापुरते काम करायचे त्यातच पुजापाठ. यातून पैसे मिळो ना मिळो पण आत्मिक समाधान तर मिळते ना या भावनेने हे कुटुंब जगत असताना निळकंठ नामक मुलाला शिवनामाचा छंद लागला. साखरखेर्डा पलसिध्द महास्वामी मठाचे पिठाधिश ष ब्र श्री श्री 108 सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी सन 1995 ला मठात आणले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण प्रचलित आहे या म्हणीचा प्रत्यय निळकंठ यांच्या कृतिशील, त्यागमयी जीवनातून याची डोळा बघायला मिळत आहे. सहजासहजी कुणाचा विश्वास संपादन करायला साजेसं आचरण लागतं तो ध्यास जिद्द चिकाटी लागते ती निळकंठ यांचेकडे होती. त्याच्या काही दिवसानंतरच निळकंठ यास उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. महाराजांच्या लाखो भाविकांनी देखील यास संमती दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय मानवत येथे चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर यांनी मठात वैदिक संस्कृत शिक्षण घेऊन काशीच्या डॉ. संपूर्ण आनंद संस्कृत विश्व विद्यालयामधून दर्शन शास्त्रातील शास्त्री ही पदवी पूर्ण केली आहे. सिध्दलींग शिवाचार्य महाराज हे संस्कृतमध्ये माहित आहेत संस्कृत त्यांच्या जीभेवर खेळते आध्यात्मिक ठसा उमटविताना महाराजांच्या सहवासात या मठात अनेक विद्यार्थी घडले. या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तर मिळालेच पण त्यांच्या खाण्यापिण्याचा आबाळही झाली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात सिध्द नामाचा गजर झाला त्यात शिवाचार्य महाराजांची भूमिका महत्त्वाची ठरली मठाच्या गादी परंपरे प्रमाणे मठाचे निळकंठ स्वामी हे 61वे शिवाचार्य म्हणून स्थानापन्न झाले आहेत. वयोमान परत्वे सिध्दलींग शिवाचार्य महाराज हे मठाची सूत्रे त्यांच्या हाती देवून त्यांचं सिद्धचैतन्य स्वामी असं नामकरण करण्यात आलं आहे. बेताच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबातील मुले हिरमोड होऊन भरकटत असतात आणि काळाच्या ओघात गडप होतात मात्र आध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेताना सहसा भरकटण्याची वेळ येत नाही यात निष्ठा आणि आचरण हा श्रध्देचा मुख्य पाया आहे अन्यथा आसाराम बापूसारखे अनेक संत तुरुंगात गेले आहेत. निष्ठा, आचरण याबळावरच निळकंठ स्वामी यांचा शिष्य ते शिवाचार्य असा प्रवास निर्मळ वृत्तीचं दर्शन घडवणारा आहे. कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचताना ताऊन सुलाखून निघावे लागते अनेक संकटाना धिरोदात्तपणे सामोरे जावे लागते शेवटी मावळणारा सूर्य उद्या उगवणारच असतो पण प्रचंड संघर्षमय प्रवास वादळी परिस्थिती यातून एका चांगल्या जीवनाची सुरुवात करता येते तसा संघर्ष शिवाचार्य महाराज यांनी भोगला तसाच संघर्ष निळकंठ स्वामी यांनीही कमी वयात पेलला बालपणीच आईचं निधन झालं अन त्यापाठोपाठ वडिल शिवैक्य झाले यातून आलेलं पोरकंपण भाविकांच्या मांदियाळीत अजिबात जाणवलं नाही शेवटी संत हेच मायबाप असतात ते प्रेरणा देतात जगण्याला नवे आयाम देतात संताना आपलं काही संपलंय आपण या जगात एकटे आहोत हे कधीच जाणवत नाही ऐवढीमोठी ताकद ही नामामध्ये आहे याच नामात दंग होऊन निळकंठ स्वामी यांनी सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून संन्यास घेतला आहे. त्यांची सहनशक्ती एकमेकांना ओळखण्याची खुबी अन कोठे काय बोलावे? कसे बोलावे? हे शिकावं तर त्यांच्या कडूनच. जास्त ऐकून कमी बोलने या स्वभावामुळे मठावर कधीच टाच आली नाही शुध्द चारित्र्यसंपन्न व्यक्तीचे वाईट गुण शोधण्याकडे अनेकांचा कल असतो तो मठाच्या बाबतीतही अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र हाती काही लागले नाही. सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांना प्रचंड विरोधकांचा सामना करावा लागला मात्र ते डगमगले नाही शेवटी चांगल्या माणसाला त्रास होतोच संत तुकाराम, संत नामदेव अशा अनेक संतांचा मागच्या काळात छळ झाला. महाराजांच्या वादळी काळाचे सिध्दचैतन्य हे साक्षीदार असल्याने अलगद पावलापावलावर अनुभवांची आयती शिदोरी त्यांच्या गाठीशी असल्याने येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटांचा ते सहज सामना करू शकतील. तेवढी शक्ती त्यांनी मिळवली आहे. हल्ली पुस्तके वाचण्यापेक्षा माणसं वाचायला हवी तशी पुस्तके आणि माणसे दोन्ही महत्त्वाची सिद्ध चैतन्य शिवाचार्य यांना दोन्ही सहज वाचता आली. मठात आल्यावर सिद्ध चैतन्य शिवाचार्य यांनी मठाचं रूपडं पालट्याचा ध्यास घेतला. मठाच्या पौराणिक भिंती, भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांच्या प्रारंभीच्या काळापेक्षा आजचे मठाचे स्वरूप यात मोठा बदल झाला आहे. सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मठाच्या वाटचालीत सिद्ध चैतन्य आल्यापासून थोडा उसासा घेता आला अन्यथा स्वार्थासाठी मठ मंदिर दिवाळखोरीत काढून पळ काढणारे महाराज कमी नाहीत. येथे तीच भिती होती पण सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात सिध्दविचार घेऊन प्रकटलेल्या सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराजांच्या खांद्यावर धर्म रक्षणाची पताका सोपविल्याने एका शिवपर्वाचा सूर्य तेजाळत राहणार आहे. सध्या भरकटत जाणाऱ्या नव्या पिढीला वेदमूर्ती निळकंठ स्वामींचा त्याग हा एक मोठा आदर्श आदर्श ठरत आहे. ते भारतभर धर्म प्रचारासाठी फिरत असतात. मंगळवार, दिनांक १३ में २०२५ रोजी त्यांचा जन्मोत्सव विविध ठिकाणी साजरा करण्यात संभाजीनगर येथे चंद्रकांतजी खैरे, बसवराज मंगरूळे यांच्या उपस्थितीत
महावीर जैन गौशाळा, चिकलठाणा येथे चारा वाटप करण्यात आले तर आधार वृध्दाश्रम रेणुकामाता मंदिर कमान बीड बायपास लिंगायत संघर्ष समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले.

सद्गुरू सिद्धचैतन्य महाराज साखरखेर्डा यांचा वाढदिवस आज भगवान बाबा आश्रम येथील मुलांना अन्नदान व आधार वृद्धाश्रम येथे ब्लँकेट वाटप करून चिखलठाणा येथील गो शाळेत गायींना चारा वाटप, जालना येथे ब्लॅन्केट वाटप करून महाराजांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बसवराज मंगरुळे, संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवा खांडखुळे, उपाध्यक्ष अशोक फुलशंकर, ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, संतोष अप्पा लिंभारे, राजेश कोठाळे, शिवानंद मोधे, महेश स्वामी, उमाकांत शंकर वार, अनिकेत स्वामी, सुरज स्वामी, शैलेश अप्पा सर्व वीरशैव लिंगायत समाज गवळी समाज यांनी अथक परिश्रम घेतले. दुसऱ्या दिवशी अयोध्येचे रामलल्लांच्या मंदिर समितीचे कोशाध्यक्ष गोविंदाचार्य यांची त्यांनी चिखली येथे भेट घेतली.