Home यवतमाळ प्रीतीला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये दोन रौप्य पदक

प्रीतीला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये दोन रौप्य पदक

164

यवतमाळ – स्थानिक अभ्यंकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती महेंद्र ढाकरगे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये याही वर्षी दोन रौप्य पदकांची मानकरी ठरली.


दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा एकोणविस वर्षे वयोगट मध्ये प्रीतीने महाराष्ट्र खो-खो संघाकडून लागोपाठ दुसऱ्यांदा सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने द्वितीय स्थानासह रौप्य पदक प्राप्त केले. यामध्ये प्रीतीचा मोलाचा वाटा आहे. तसेच बिहार येथे संपन्न झालेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये प्रीतीची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. या स्पर्धेतही प्रीतीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व महाराष्ट्र संघाला द्वितीय स्थानासह रौप्य पदक प्राप्त करून दिले.
प्रीतीने एकाच वर्षात लागोपाठ दोन वेळा रौप्य पदक प्राप्त केले. तसेच याच वर्षी आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ गट खो-खो स्पर्धेमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला होता. प्रीतीने यापूर्वीही खेलो इंडिया युथ गेम व शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच तिला महाराष्ट्र शासनाकडून पाच लाख रुपयांची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली होती. प्रिती नवजयहिंद क्रीडा मंडळाची खेळाडू आहे.
प्रीती आपल्या यशाचे श्रेय आई दीक्षा, वडील महेंद्र, वुमन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. ए. पी. दर्डा, सचिव रमेश मुणोत, मुख्याध्यापिका मोहना गंगमवार, उपमुख्याध्यापक अविनाश जोशी, पर्यवेक्षिका प्रगती पराते, क्रीडा शिक्षक संजय बट्टावार, प्रशिक्षक पंकज रोहणकर, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घावडे ,सचिव विकास टोने, नवजयहिंद क्रीडा मंडळाचे प्रदीप वानखेडे, अमोल बोदडे, जम्मू लालूवाले, आशिष प्यारलेवार, अमोल ढोणे, कैलास शिंदे यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनास देते.