Home मराठवाडा अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

172

नांदेड , दि. ०७ ( राजेश भांगे ):- अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 110 वी प्रक्रिया (शिकाउ उमेदवारी योजना) गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली आहे. या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क 6 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीत भरुन आस्थापनेमार्फत बी. टी. आर. आय. विभागात विहित कालमर्यादेत सादर करावे. ऑनलाईन परिक्षा 20 ते 22 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बी. टी. आर. आय. केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे क. प्र. सल्लागार एस. एस. ठक्के (भ्रमणध्वनी क्र. 9420541404) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.