घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस स्तेशनला कार्यरत ठाणेदार प्रविण लिंगाडे यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांचे जागेवर ठाणेदार म्हणून संदिप नरसाळे रुजू झाले आहे.त्यांची घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहु उद्देशिय संस्थेचे पदाधिकारी,सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट घेतली.
दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बहुल असलेल्या पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास १०२ दोन गावे येतात.त्यात अल्प पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर येथिल कारोबार चालविवावे लागतात.यासाठी याठिकाणी नविन ठाणेदाराला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचा कानोसा घ्यावा लागतो.अश्यातच उच्च शिक्षित व अनुभवी ठाणेदार संदीप नरसाळे रुजू झाले असून त्यांच्या प्रती जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शांतता व सुव्यवस्था यासाठी परिचित असलेला पारवा पोलीस स्टेशन असले तरी नकळत कोणती बाब कधी घडेल हे नाकारता येत नाही.
अश्यातच त्यांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांनी आपण सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्य करणार असून पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देवून त्यांचे समाधान कसे करता येईल यासाठी सदैव तत्पर राहणार आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले प्रयत्न असून याला जनतेचे सुद्धा सहकार्य लाभने तेवढेच गरजेचे आहे.खऱ्या गुन्हेगारांवर आपण कायदेशीर कारवाई करणार आहे.गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असून समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावा गावात कायद्याची माहिती देवून समाजात एकोपा घडवावा.तश्या नागरिकांचा आपण सन्मानच करणार आहे असे ते या भेटीत पत्रकारांशी बोलत होते.याक्षणी घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहु बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नविन ठाणेदारासोबत पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक विषयावर साधक – बाधक चर्चा केली.
याप्रसंगी घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहु उद्देशीय संस्थेचे सचिव राजू चव्हाण, उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे,सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद,जांब ग्राम पंचायतचे सरपंच रमेश सिडाम, सदस्य काशिराम कुळसंगे, भाजपा आदिवासी आघाडी घाटंजी तालुका अध्यक्ष सुभाष आडे हे उपस्थित होते.