Home विदर्भ दिघोरी उड्डाणपुलाजवळ वाईन शॉप च्या नावाने परिसरात उघड्यावर बार सुरु.

दिघोरी उड्डाणपुलाजवळ वाईन शॉप च्या नावाने परिसरात उघड्यावर बार सुरु.

24

उमेश सावलकर

नागपूर – प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिघोरी रिंग रोड वरील पुलाजवळ ओमकार सेलिब्रेशन हॉल च्या समोर स्टार वाईन शॉप सुरु असून तिथे सायंकाळच्या सुमारास दारू खरेदीसाठी भीड जमा होते. दारू वाईन शॉप मधून खरेदी करून आजूबाजूला रस्त्यावर पिणाऱ्यांची गर्दी रोजच पाहण्यास मिळते.

वाईन शॉपच्या आजूबाजूच्या परिसरात अंडी विकणारे, खाद्य पदार्थांचे दुकाने तसेच प्लास्टिक ग्लास व पाणी विकणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. दारू पिणारे तिथेच आपले पिण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडत असून रस्त्यावरच लघुशंका करतात. त्यामुळे परिसरातील लोकांना याचा त्रास होत आहे. संध्याकाळी परिसरातील महिला तसेच नागरिक त्यामुळे तिथून जाण्यास घाबरतात. जागेची पाहणी केली असता तिथे कुणाचाच धाक नसल्याचे दिसून आले आहे. करीता पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष वेधून परिसरातील नागरिकांना संरक्षण देण्याकरिता पाऊल उचलण्यात यावे असे नागरिकांनी सांगितले.