Home महत्वाची बातमी वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो.

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो.

61

वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण सातत्याने देत असतात…

साधारपणे मराठी वृत्तपत्र हे 1832 सालापासून आज पावेतो जवळपास 192 वर्षांचा समृद्ध इतिहास या क्षेत्राला आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारे या क्षेत्राला इतर 3 स्थंभासारखे ( कायदेमंडळ न्यायव्यवस्था व कार्यकारी व्यवस्था ) कोणताही स्वतंत्रपणे भक्कम आधार नाही, कार्यपद्धती नाही आणि कोणतेही संरक्षण सूद्धा नाही.

पुरोगामी महाराष्ट्र मध्ये खूप काही काळ गेल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा विकसीत झाला व त्यामध्ये पत्रकार संस्था कार्यलय इ संरक्षण केले गेले. आज परिस्थीती पाहता पत्रकार म्हणून काम करताना कितीतरी सरकारी योजना मधील उणिवा, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणेचे काम या व्यवस्थेमधून झालेले आहे व ते निरंतर सुरूच आहे.

दर्पणकार बाळंशात्री जांभेकरांनी इंग्रजी सत्ताधारी यांना स्थानिकांच्या अडचणी व भावना कळाव्यात म्हणून त्या काळी सूद्धा दर्पण मधून काही स्तंभ इंग्रजी मधून लिहले जात होते. आर्थीक अडचणी मूळे 7-8 वर्ष पूढे ते सन 1840 साली दर्पण बंद झाले परंतू दर्पण ने मराठी वृत्तपत्रव्यस्थेचा पाया रोवला. पूढे अनेक वर्षांच्या प्रवासा नंतर महाराष्ट्रातील नामांकित वृत्तप्रे – दै.सकाळ (सन 1932 डॉ नानासाहेब परूळेकर) पूढारी, सन 1937 साली कोल्हापूर येथून तर महाराष्ट्र टाईम्स सन 1962 (टाईम्स समूह), लोकमत (सन 1971 जवाहरलाल दर्डा ), विदर्भातील नामांकित दैनिक देशोन्नती, पूण्यनगरी असा खूप मोठा प्रवास या वृत्त पत्रांनी केला. महाराष्ट्रातील वाचकांनी देखील या सर्वच वृत्त पत्रांचे वाचन करताना प्रादेशिक पंसती दाखवली. पूणे करांनी दै सकाळ ला अधिक पसंती दिली तर मराठवाडातील जनता लोकमत तर विदर्भ – देशोन्नती ला अधिक पसंती देतात. कोल्हापूर सातारा सांगली येथे पूढारी मोठ्या प्रमाणात स्विकारला गेला आहे. सामान्य वाचकांचा पूण्यनगरी तर उच्चभू लोकांचा लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स यांनी आपली जागा निश्चीत केलेली आहे. मनोरंजनाचे साधन संध्यानंद ला काही घटकांनी स्विकारलेले आहे व हा प्रवास मासिक साप्ताहिक दैनिक सायंदैनिक, मॉर्नंग बूलेटीन, अफ्टरनून बूलेटीन इ पर्यत येवून पूढे निरंतर सूरूच आहे. आता पीडीएफ वृत्तपत्र असंख्य दररोज नवनविन नावाने येत आहेत…

पत्रकारीता क्षेत्र हे अतिशय जबाबदारीचे क्षेत्र आजवर राहीलेले आहे. जस जसे इंटरनेट यू ट्यूब चॅनल सोशल मिडीया व्हॉटसॅप फेसबूक ट्वीटर इ समाज माध्यमे आली तेंव्हा पासून पांरपारिक पत्रकारितेला नव्याने संघर्ष उभा ठाकलेला दिसून येतो. भविष्यात काय खरे आणि काय खोटे कळायला मार्ग दिसेल का याचे उत्तर निश्चीतपणे मिळेल यात शंका आहे… प्रामाणिकपणे वार्ताकन लिहणारे पत्रकाराचे हात मोठ मोठाले जाहिरातदार यांचे विषयी व विरुद्ध बातमी लिहतांना थरकाप करतील काय याबाबतही मनात शंका येते. गोरगरिबांवर ,वंचित घटकांवर, महिला ,आदिवासी विकास योजना बालकांचे शेतमजूरांचे प्रश्न यावर लिहताना समस्या, कारणे व उपाय सूचवणे या माध्यमातून आणखी मोठे काम होणे आवश्यक आहे…

असिम प्रगल्भता ,उत्तम वैचारिकता व राष्ट्रीय चारित्र्य याचे वसा व वारसा घेवून दैनंदिन आयुष्य जगणारे असंख्य पत्रकार आहेत परंतू हाताचे बोटावर मोजणारे जर तुम्ही हे केले नाही तर मी असे करेन असे प्रश्नार्थक पत्रकार मोजकेच असले तरी त्यांनी या क्षेत्राला सूरूंग लावणे सुरू केले आहे. परिणामी आजवर अनेक दूर्घटना झाल्या जाणिव पूर्वक टारगेट केल्याने खचून जावून अनेकांनी बदनामीचे भितीने आत्महत्या केल्या तर किती जनांवर प्राणघातक हल्ले सूद्धा झाले. त्यामूळे या क्षेत्राला सूद्धा तातडीने संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे व ती गरज ओळखून पूरोगामी महाराष्ट्र मध्ये संरक्षण कायदा झालेला आहे असे दिसते.

पोलीस अधिकारी म्हणून नोकरीत असतांना अनेक पत्रकार बांधव माझे चांगले मित्र आहेत. प्रत्येकाचे समस्या खूप वेगवेगळ्या आहेत. अतिशय चांगली बुद्धीमत्ता असतांना सुद्धा नोकरीची संधी गेली म्हणून पत्रकार तर नोकरी करत असताना दैनिक प्रतिनिधी म्हणून काम करणारे (संरक्षण कवच) पत्रकार बांधव आहेत. काहींनी तर पत्रकारिता हे व्रत स्विकारलेले आहे. दंगल सदृष्य परिस्थीती मध्ये ही रिपोर्टींग करणारे, दमछाक होई पर्यंत बाईट साठी तळमळणारे बातमी मागील बातमी शोधणारे अनेक पत्रकार बांधवांना आम्ही ओळखतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून गाझा पट्टीवर सुध्दा मराठी पत्रकार मागील वर्षी जगाच्या पाठीवर युद्दभुमित live coverage दाखवताना जनतेने पाहिले…
उत्सुकता, कर्तव्य प्रति सजगता व संस्थेशी बांधिलकी असेलमुळे सकाळ पासुन संध्याळपर्यंत न थकता न थांबता आपण सतत धडपडत असता….
प्रत्यक्ष पणे प्रत्येकाचा आदर सन्मान व मैत्री होणे शक्य जरी नसले तरी पत्रकार म्हणून काम करणारे सर्वच घटकांचा, वार्ताहार, बातमीदार, उपसंपादक, संपादक व सर्व टीम यांचा मनापासून आदर आहे.

समाजातील गोरगरिब जनतेचा खरा आवाज ,महिलामूलीचे संरक्षण, अदिवासींचे हक्क व विद्यार्थी, कामगार शेतकरी यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे एकमेव साधन आपण सर्व पत्रकार बांधव आहात.
आज पत्रकारांमूळे प्रशासकीय व्यवस्थेला सूद्धा पारदर्शकता आलेली आहे. पत्रकारांनी निर्माण केलेला एक ” *वैचारिक दबाव* ” शासन व्यवस्थेला सरळ मार्गी लोकांचे प्रश्न सोडविणे कामी भाग पाडतो यातच पत्रकारितेचे यश सामावलेले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जोपासण्याचे उत्तम काम ही अनेक पत्रकार बांधव स्वतःच्या यू ट्यूब चॅनल चे माध्यमातून आता करु लागले आहेत… ज्यांची संस्थे मध्ये घुसमट व्ह्यायची ते आता मुक्त पणे संचार करु लागलेले आहेत…
पत्रकार म्हणून काम करत असताना आपण भारत देश पूढे नेणारे शिल्पकार आहात अशी भावना कायम अपल्या मनात असावी… नवीन 2023 साली आलेला कायदा व नियम याचा देखिल आपणास अभ्यास असावा…

आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन करतो व माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ।

आपले हातून समाजाची निस्सीम सेवा घडो या सदिच्छेसह आपणांस पत्रकार दिना चे निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा ।
दुरितांचे तीमिर जावो

आपलाच –

विनोद चव्हाण , सहाय्यक पोलिस निरीक्षक, मो न – 9011090975