Home महत्वाची बातमी अंगाला हळद लागली हाथावर मेहंदी ही सजली लग्नाला अवघे काही तास होते...

अंगाला हळद लागली हाथावर मेहंदी ही सजली लग्नाला अवघे काही तास होते शिल्लक अन , विपरीतच घडलं ,

55

अंगाला हळद लागली हाथावर मेहंदी ही सजली लग्नाला अवघे काही तास होते शिल्लक अन , विपरीतच घडलं ,

अमीन शाह

सोलापूर : बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या करून जीवन संपविले. लग्नाच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. हळदीचा कार्यक्रम पार पडल त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. सकाळी उठले तर नवरी सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले होते
लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडलाय.

सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील काही तरुण सालिया हिचे लग्न होऊ नये या साठी त्रास देत होते. तसेच होणाऱ्या नवरदेवास आणि मुलीच्या वडिलांना देखील फोन करून धमक्या देत होते. गावातील समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख ह्या तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केलाय.

गळफास घेतं आपले जीवन संपवले

सालिया शेख हिचा विवाह 18 डिसेंबर रोजी विजयपूर येथील तरुणाशी होणार होता. त्यासाठी कुटुंबाने संपूर्ण तयारी देखील केली होती. रात्री घराजवळ हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. त्यानंतर पहाटे च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.

नवऱ्यास दिली होती जीवे मारण्याची धमकी

समीर शेख आणि सलमान शेख या तरुणांच्या विरोधात सालिया शेख हिने स्वतः पोलिसात तक्रारी अर्ज देखील दिला होता. समीर आणि सलमान हे लग्न केल्यास होणाऱ्या नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. तसेच समीर सोबत माझे संबंध असल्याचे सांगून बदनामी करत असल्याचा उल्लेख पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सालिया हिने केला आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधीत तरुणांना तात्काळ अटक करत कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीचे वडीलांनी केलीय.

पोलिसांत गुन्हा दाखल

दरम्यान, मृत सालिया हिचे वडील महिबूब साहेबलाल शेख यांच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी समीर चाँदसाहेब शेख याच्यासह सलमान पीरसाहेब शेख आणि वसीम सैफन शेख (तिघे रा. कुमठे, सोलापूर) यांच्याविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. यातील समीर याने सालिया हिच्यावर एकतर्फी प्रेम करून लग्नाची मागणी घातली असता तिने नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिला त्रास देऊन ब्लॅकमेलिंग सुरू केले. यात त्याच्या अन्य दोघा मित्रांनी साथ दिली. सालिया हिचे लग्न विजयपूरच्या गौसपाक सांगलीकर या तरुणाबरोबर निश्चित झाले असताना हे लग्न मोडण्यासाठी समीर याने मृत सालियाशी संबंधित छायाचित्र आणि चित्रफित आक्षेपार्ह स्वरुपात नववराला समाज माध्यमातून पाठविले. त्यामुळे लग्न मोडल्याने सालिया हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ,