Home मुंबई खेळत असलेल्या लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

खेळत असलेल्या लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

713

अमीन शाह

भिवंडी मुंबई , दि. ०४ :- लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत तरुणाच्या हाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलांच्या प्रसंगावधनाने पोलिसांनी भामट्याला चांगलाच धडा शिकवला. भिवंडी शहरात आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता. ही बाब पीडित मुलांनी आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी प्रसंगावधान राखून इमारत परिसरात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले. मुलांनी केलेली तक्रार खरी निघाली. पालकांनी निजामपुरा पोलिस स्टेशन गाठून या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन नझराना कंपाऊंड येथील राधाकृष्ण सोसायटीच्या इमारतीत राहणारा कमलेश शांतीलाल जैन या 36 वर्षीय विकृत भामट्याच्या मुसक्या आवळून त्याच्या हाता बेड्या ठोकल्या.