Home सातारा वैधमापनशास्त्र विभाग पथकाने केलेल्या पाहणीत खटाव-माण अँग्रो चा वजन काटा अचूक

वैधमापनशास्त्र विभाग पथकाने केलेल्या पाहणीत खटाव-माण अँग्रो चा वजन काटा अचूक

174

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०४ :- खटाव माण अँग्रो पडळ कारखान्याच्या ऊस मोजणी काट्याची पुणे येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या पथकाने सोमवारी अचानक पाहणी केली,या पाहणीत ‘खटाव-माण अँग्रो’ चा काटा अचूक असल्याचा अहवाल पथकाच्या प्रमुख उपनियंत्रक श्रीमती सीमा बैस यांनी दिला. यामुळे चेअरमन ,माजी आमदार प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज घोरपडे यांनी उभारलेला कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे.
गत आठवड्यात खटाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पाटील यांचेसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी पथकाने खटाव माण अँग्रो च्या वजन काट्याची पाहणी केली असता त्यावेळीही काट्याची पारदर्शक अचूकता या पथकास मिळून आली होती.
यामुळे खटाव माण सह कराड उत्तरच्या तसेच सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या खटाव माण अँग्रोच्या कार्यस्थळी वैधमापनशास्त्र पुणेच्या श्रीमती सीमा बैस यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गव्हाणीजवळ गेलेली ऊसाने भरलेली वाहने व रिकामी वाहने यांची वजने घेतली असता वजनात कोणतीही तफावत यात आढळली नाही .वजनकाटा अचूक असल्याचा अहवाल देण्यात आला.
यावेळी पथकाचे सहाय्यक नियंत्रक गायकवाड,कोरेगाव विभाग निरीक्षक एस जी धोपाटे,वाई विभाग निरीक्षक डी जी कांबळे,कोल्हापूर विभाग निरीक्षक ए के महाजन,कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी किरण पवार,सुरेश चव्हाण,अशोक चव्हाण,जयदीप थोरात,अभिजित निकम उपस्थित होते.यावेळी कारखान्यातर्फे पथकाचे स्वागत व आभार अमोल पाटील यांनी केले.

“शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र अशा खटाव माण अँग्रोची विश्वासहर्ता पुन्हा एकदा पुण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत सिद्ध झाली आहे. कारखान्याशी संबंधित ऊस उत्पादित शेतकरी,ऊसतोड कामगार यांच्याशी असलेली खटाव-माण अँग्रोच्या वजनकाट्याची पारदर्शक विश्वासहर्ता आम्ही सदैव टिकवू -कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे.”