विदर्भ

🌸 विधान परिषद निवडणुकीत महाविकास अाघाडीचा झेंडा दुष्यंत चतुर्वेदी यांचा दणदणीत विजय तर भाजपाचे सुमित बाजोरिया यांची हार…!

Advertisements

आ. संजयभाऊ राठोड व गोपाल सेठ अग्रवाल यांची भूमिका महत्वाची.!

नितीन सोनाळे

यवतमाळ / उमरखेड , दि. ०४ :- यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ३१ जानेवारी रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणी नंतर समोर आला.महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणारे दुष्यंत चतुर्वेदी हे विजयी झाले.त्यांनी भाजपचे सुमित बाजोरिया यांचा पराभव केला.

यांना २९८ मते मिळाली . तर भाजपाचे सुमित बाजोरीया यांना १८५ मते मिळाली. या निवडणुकीत सहा मते बाद ठरली.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपुरचे असल्याने त्यांचा संपर्क कसा होईल ? ते खरचं यवतमाळ जिल्हा वासियांच्या विकास कामात लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. भाजपचे सुमित बाजोरीया यांना यवतमाळ जिल्ह्याचा इतंभूत अभ्यास असून ते जनतेच्या कामी येतील व विकास कामावर लक्ष देतील असेही बोलल्या गेले . ही निवडणूक सुरुवाती पासूनच चुरशिची ठरली. दोन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी अथक प्रयत्न केले . बाजोरीया व चतुर्वेदी यांनी आपआपले मतदार वेगवेगळ्या ठिकाणी हलवले . काही मतदारांना देवदर्शन व इतर ठिकाणी फिरवण्यात आले . ‘लक्ष्मी दर्शनाचा’ मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप झाल्याने मतदारांचे ‘चांगभले’ झाले . मतदारांच्या मनात नसलेला प्रसाद त्यांच्या हातावर पडल्याने अनेक मतदारांना आकाशात भिरक्या घेत असल्याचा भास झाला. भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भुतडा यांचे प्रयत्न निष्फळ ठरले याचे महत्वाचे कारण विरोधी उमेदवारांनी घोडा बाजाराला दिलेली ढिल?
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आ. प्रा.तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्याने येथील जागा रिक्त झाली होती. शिवसेनेने नागपुरातील काॅंग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव लक्ष्मीपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी आ. संजयभाऊ राठोड ,गोपालसेठ अग्रवाल, शहर प्रमुख संदिप ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विकास आघाडीचे बहुमत होते.तथापी शेवटच्या क्षणी कोणत्या उमेदवाराचे ‘तराजू’ जड ही चाचपणी मतदारांनी केली. निवडणूक रिंगणातील दोन अपक्षांनी चतुर्वेदी यांना पाठींबा जाहिर केल्याने त्यांच्या गळ्यात ‘विजश्री’ ची माळ पडेल हे निश्चित झाले होते. अटितटीच्या निवडणुकीत महाविकास अाघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी बाजी मारली. या निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.
⏱🚩✋🏻

You may also like

विदर्भ

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या ...
विदर्भ

राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसिलदार भगवंत कांबळे यांचा सत्कार,  ‘उपजिल्हाधिकारी पदी बढती,राज्यभरातून अभिनंदन”

धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...