Home महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा घडली संताप जनक घटना

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा घडली संताप जनक घटना

295

नांदेड / माळटेकडि , दि. 4 :- ( राजेश भांगे );- नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथील शाळेत घडलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेला महिना उलटला नाहि तोच पुन्हा एकदा अशीच संताप जनक घटना नांदेड मधील माळटेकडि येथे घडली .

नांदेड मधील माळटेकडि येथील प्रबोधन प्राधमिक विद्यालय महाळज येथील तिसऱ्या वर्गात शिकणाय्रा ( चिमुकल्या ) विद्यार्थींनीला अश्लिल चित्रफित दाखवून याच प्राथमिक विध्यालयातील नराधाम शिक्षक स्वप्निल श्रंगारे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असुन या घटने विषयी विमानतळ पोलिस स्टेशन येथे 354 व पोक्सो अॕक्ट कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करून पोलिसांनी मोठ्या तत्परतेने तात्काळ नराधाम आरोपी शिक्षकास अटक केले व न्यायालयात हजर करून पुढिल तपासा साठि अरोपीच्या पोलिस कस्टडिची मागणी करणार असल्याचे कळविण्यात आले.