Home विदर्भ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचेव्दारा फेरो अलॉय प्लान्ट व बँक...

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचेव्दारा फेरो अलॉय प्लान्ट व बँक ऑफ महाराष्ट्र च्या ओबीसी आरक्षण धोरणासंबंधी सुनावणी व कार्य आढावा

95

चंद्रपूर :- मागासवर्गीयांच्या आरक्षण धोरण व आरक्षणविषयक रोस्टर प्रणाली नुसार सर्व प्रवर्गास तसेच मागासवर्गीय उमेदवारांच्या आरक्षणाचा अनुशेष अद्ययावत करण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी चंद्रपूर फेरो अलॉय प्लान्ट (सेल) तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर शाखेच्या आढावा बैठकीत वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी ओबीसी आरक्षण धोरण व आरक्षण रोस्टर नुसार या आस्थापनांमध्ये नोकरभरती केल्या गेली आहे किंवा कसे या संदर्भात सन 2021-22 व 2022-23 या वित्तीय वर्षांचा सविस्तर आढावा या बैठकीत एन.सी.बी.सी. अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतला. या बैठकीस चंद्रपूर फेरो अलॉय प्लान्टचे कार्मिक महाप्रबंधक बी. विश्वनाथ, महाप्रबंधक नरेश शर्मा व अन्य अधिकारी उपस्थित होते. सी. एफ. ए. च्या बैठकीत ओबीसी आरक्षण धोरणानुसार 27 टक्के आरक्षण देण्याकरिता अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी सुचना केली.
सदर बैठकीत मनुष्यबळ कमी असल्याने अधिकाऱ्यांनी नव्या भरतीकरिता वरिष्ठांकडे मागणी नोंदवावी व अन्य प्रवर्गाबरोबरच मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत विशेष लक्ष पुरविण्याची सुचना केली या आढावा बैठकीत कंत्राटी कामगारांमधील इतर मागासवर्गीयांची टक्केवारी तसेच सामाजिक दायित्व निधीची (सीएसआर) व या निधीमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सिपेट अंतर्गत प्रशिक्षण मिळवून देण्याकरिता पुढाकार घेण्याचे सुचना केली. सीएसआर निधीमध्ये भरीव तरतूद करीत सामाजिक दायित्वातून रचनात्मक कार्य करण्यावर भर द्यावा असेही अधिकाऱ्यांना सुचित केले.
या बैठकीत हंसराज अहीर यांनी राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील कर्मचारी संवर्गाचा आढावा घेतला. बँकेत ओबीसी कर्मचाऱ्यांची संख्या 27 टक्केपेक्षा कमी आढळून आल्याने ही सरासरी नियमानुसार ठेवण्याकरिता सुचना केली. बँकेच्या ओबीसी वेलफेयर असोसिएशनव्दारा ओबीसींच्या संदर्भातील विविध प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची कार्यवाही बँक प्रबंधनाने करावी. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून किती लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले व या लाभार्थ्यांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला याचाही आढावा बैठकीमध्ये घेतला.
यावेळी बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधकांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेव्दारे जिल्ह्यातील एकुण 6325 लाभार्थ्यांना 216.08 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले असून यापैकी ओबीसी प्रवर्गातील 3864 लाभार्थ्यांना रु. 120.77 कोटी चे कर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती एन.सी.बी.सी. अध्यक्षांना दिली. कर्जमर्यादा व लाभार्थ्यांची संख्या अल्प असल्याने कर्जाची मर्यादा वाढवून अधिकाधिक लाभार्थ्यापर्यंत मुद्रा लोन योजनेचा लाभ पोहचवावा व अल्पकर्जाऐवजी भरीव कर्ज उपलब्ध करण्यासाठी बँक प्रबंधनाने पुढकार घ्यावा असे निर्देश या सुनावणीत आढावा प्रसंगी दिले. यावेळी अध्यक्ष महोदयांनी बँकेने सीएसआर अंतर्गत मागासवर्गीयांमधील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी साहीत्याचे तसेच स्वास्थ्य क्षेत्रात लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करण्यावर विशेष भर द्यावा अशी सुचना केली. या बैठकीस भाजपा पदाधिकारी राजु घरोटे, बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजीव कलवले, उपक्षेत्रीय प्रबंधक भास्कर देव यांची उपस्थिती होती.