Home बुलडाणा आंबेवाडी फाट्यावर टिप्पर दुचाकी च्या भिषण अपघातात दोन युवक ठार ,

आंबेवाडी फाट्यावर टिप्पर दुचाकी च्या भिषण अपघातात दोन युवक ठार ,

55

सिंदखेड राजा

भगवान साळवे
तालुक्यातील मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रोडवरील अंबेवाडी फाट्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकल स्वार एक युवक जागीच ठार, तर पाठीमागे बसलेला गंभीर जखमी दुसरा युवक उपचारा साठी नेत असताना मृत्युमुखी पडला अपघातात ठार झालेले मोटर सायकल स्वार दोघे युवक चुलतभाऊ असून ते शेंदुर्जन येथील रहिवासी होते भावकीतील एका लग्नाच्या बस्त्यासाठी जालना कडे जात असताना गावापासून थोड्याच अंतरावर गेल्यावर त्यांचा हा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातात बस्ता बांधण्याच्या पूर्वीच मृत्यूमुखी पडले हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलला टिप्परने एक फर्लाग फरफडत नेले घटनेनंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला परंतु, साखरखेर्डा पोलिसांनी त्याला जेरबंद केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

या भीषण अपघाताची माहिती अशी की शेंदुर्जन येथील खोडके परिवारातील लग्नाच्या बस्त्यासाठी भावकीतील मंडळी जालना येथे चालली होती त्यासाठी काही मंडळी क्रूजर गाडीने चालली तर अपघातात ठार झालेले दोघे चुलत भाऊ अमोल शिवाजी खोडके (वय २२) व ओंकार गैभीनाथ खोडके (वय १९) हे दोघे जन मोटरसायकल वरून जालन्याकडे बस्ता फाडण्यासाठी चालले होते गुरुवारच्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चालले होते शेंदुर्जन पासून चार किलोमीटर पुढे गेले असता आंबेवाडी फाट्यावर समोरून भरधाव येणाऱ्या एमएच २८ बीबी १२९९ या क्रमांकच्या टिप्परने त्यांच्या एम एच २१ बीसी ८३३ या शाइन मोटरसायकलला जोराची धडक देऊन उडविले. त्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला तर दुसरा पाठीमागे बसलेला ओंकार हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारसाठी नेत असतानाच त्याचाही मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की मोटर सायकल टिप्परच्या दोन्ही चाकाच्या मधामध्ये जाऊन 200 मीटर फरफडत गेली होती अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला. अपघाताची माहिती मिळतात अपघातग्रस्त युवकांना जाणार येणाऱ्या आणि गावकऱ्यांनी तातडीने मदत केली. तसेच, अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे व निवृत्ती पोकळे आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अमोल हा जागीच ठार झाला होता. तर पाठीमागे बसलेला ओम गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नेले असताना त्याची प्राणज्योत मालवली. पळून गेलेला ट्रकचालक दादाराव मगर राहणार मलकापूर पांग्रा आरोपी हा साखरखेर्डा पोलिस ठाण्यात जमा झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे करत आहेत.