Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद...

महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको – महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका

23
0

आसाम सरकारने 14 फेब्रुवारी 2023 या दिवशी एक जाहिरात प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. खरेतर तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आदी धार्मिक गोष्टींमध्ये राजकारण होणे दुर्दैवी आहे. देव, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा-परंपरा, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी धार्मिक गोष्टींविषयी धार्मिक क्षेत्रातील तज्ञ अर्थात शंकराचार्य, धर्माचार्य, संत-महंत आदी अधिकारी व्यक्तींना बोलण्याचा अधिकार आहे. राजकारण्यांनी धार्मिक गोष्टींबद्दल न बोललेलेच बरे. स्वत: आद्य शंकराचार्य यांच्या बारा ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलिलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच सहावे भगवान शिवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्वयंस्पष्ट आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या घनदाट जंगलातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले श्री भीमाशंकर हेच अत्यंत प्राचीन आणि सहावे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे, *असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची भूमिका देशासमोर मांडावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम अडत्यांच्या फसवणुक प्रकरण
Next articleआंबेवाडी फाट्यावर टिप्पर दुचाकी च्या भिषण अपघातात दोन युवक ठार ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here