Home बुलडाणा अन , ती रात्र त्यांच्या साठी ठरली काळरात्र ,

अन , ती रात्र त्यांच्या साठी ठरली काळरात्र ,

158

 

 

अमीन शाह

बुलडाणा

आधीच आस्मानी संकट त्यात नापिकी कसे बसे पिक आले तर त्याला भाव नाही सरकार शेतात दिवसा वीज नसल्या मुळे शेतकऱ्यांना रात्री चा दिवस करावा लागत आहे रात्रीच्या पाणी देण्या मुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत   बुलढाणा जिल्ह्यात एक गँभीर घटना घडली असून कालची रात्र त्या शेतकऱ्या साठी काळरात्र ठरली मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील झोपडीला आग लागून 35 वर्षीय शेतकरी व एका श्वानाचा होरपळुन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व
श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते ,या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील 35 वर्षीय शेतकरी गणेश विजय नारखेडे हे रात्रीच्या सुमारास शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते . रात्री उशीर झाल्याने ते झोपडीतच झोपले होते . दरम्यान झोपडीला आग लागून या आगीतच शेतकरी व एका श्वानाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली . सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब निदर्शनास येताच घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली . घटना कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा यांनी आपल्या टीम समवेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला .पुढील तपास सुरू असून नेमकी आग कशा मुळे लागली हे उघडकीस येण्याची शक्यता आहे घडलेल्या घटने मुळे गावात दुःख वयकत केले जात आहे ,