Home बुलडाणा शाळा आणि ट्युशन परिसरातील रोड रोमिओ चा बंदोबस्त करण्याची मागणी

शाळा आणि ट्युशन परिसरातील रोड रोमिओ चा बंदोबस्त करण्याची मागणी

175

गितांजली टॉकीज परिसरात रोड रोमिओ चा सुळसुळाट

रवी अण्णा जाधव
देऊळगाव राजा:-हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या शहरात आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे या शहरातील चिखली रोडवरील दीनदयाल विद्यालय, कमल नेहरू विद्यालय, समर्थ कृषि महाविद्यालय इत्यादी महाविद्यालयांमध्ये असंख्य विध्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. तसेच या भागात अनेक कॉलन्यांमध्ये लोकवस्ती वाढलेली असून त्या भागातील महिला देखील या रोडने वहिवाटी करीत असतात. परंतु काही मोकाट तरुण मुले ही गीतांजली टॉकीज जवळ असलेल्या टपरिवर तसेच चिखली रोडवरील काही ठिकाणी बसलेली असतात तसेच ही रोड रोमिओ मुले शाळकरी महाविद्यालयीन तसेच रस्त्याने वावरणाऱ्या महिलांना व मुलींना उद्देशून टॉन्ट मारणे,मोठमोठ्याने बोलने व हसणे, इशारे करणे,त्यांना पाहून थुंकने अशा प्रकारे आक्षेपार्ह कृत्ये करीत असतात.त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची व विद्यार्थिनींची कुचंबणा होऊन त्यांना रस्त्याने ये-जा करणे सुद्धा कठीण झाले आहे. तसेच त्यांना लज्जास्पद वाटत असल्याची तोंडी तक्रार अनेकांनी आमच्याकडे केली आहे. याबाबत या आगोदरसुध्या आपल्या कार्यलयात काही नागरिकांनी निवेदने दिली होती परंतु त्यावर आपल्या कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे या रोड रोमिओ मुलांची हिंमत वाढली असून यामुळे एखादा अनुचित प्रकार शहरात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी मे. साहेबांना बालाजी नगर,विवेकानंद नगर,समता कॉलनी मधील समस्त रहवाशी असून या परिसरातील महिलांना व विद्यार्थिनींना होणार त्रास या गंभीर विषयाकडे तात्काळ जातीने लक्ष देऊन या मोकाट रोड रोमिओ चा बंदोबस्त लावावा व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायला हवी पोलीस या रोड रोमिओवर काय कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे….एव्हडे मात्र खरे