Home मराठवाडा चुलत्याकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीची गळ्यावर चाकूने वार करून निर्घृन हत्या

चुलत्याकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीची गळ्यावर चाकूने वार करून निर्घृन हत्या

259

 

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील ईश्वरी रमेश भोसले (वय आठ) ही मुलगी इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

ईश्वरीचे आई -वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काकांकडे शिक्षणासाठी ठेवले होते. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात.
आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही काकांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार होते.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तिला तातडीने मंठा चौकातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. ईश्वरी आणि तिच्या काकांची 13 वर्षाची मुलगी यांच्यात नेहमी भांडण होत असे, त्यातूनच तिचा खून झाल्याची चर्चा आहे.
घटनास्थळी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक वनवे, सहायक फौजदार सय्यद, संदीप बेराड, वसंत धस, सुनील गांगे, राम शेंडीवाले, अरुण मुंडे, किशोर जाधव, टेकाळे आदींनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.