Home मुंबई रविंद्र नाट्यमंदिरातील पु.ल.देशपांडे सभागृहात ‘निनाद’ चा 50 वा सुवर्णमोहोत्सवी वर्ष थातात संपन्न..

रविंद्र नाट्यमंदिरातील पु.ल.देशपांडे सभागृहात ‘निनाद’ चा 50 वा सुवर्णमोहोत्सवी वर्ष थातात संपन्न..

82

 

मुंबई ( अनुराग पवार )
‘निनाद’ सुवर्णमोहोत्सवी वर्षा निमित्ताने दि 12 शनिवारी दुपारी 4 ते 10.30 वाजेपर्यंत रविंद्र नाट्यमंदिरातील पु.ल.देशपांडे सभागृहात घुमला. ‘निनाद’ चा नाद काही नाटकवेड्यांनी म्हणजे निनाद चे आधारस्तंभ विजय मोंडकर ( बापू ) ,प्रकाश गद्रे व जयवंत देसाई यांनी कामगार विभागातील तरुणांचे गुण हेरुन लावलेलं हे कलेच रोपटं आज पंन्नास वर्षाचा मोठा वृक्ष झाला. या कला वृक्षाच्या सावलीत अनेक तरुण,तरुणी आले.आपापल्या परीने ज्ञानार्जन केलं, हि पिलं मोठी झाली.

आणि उंच भरारी घेत, अनेक क्षेत्रात,कलाक्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करीत भक्कम उभे राहीले. ‘निनाद’ चा नाद सदैवं निनादत ठेवला. त्याच या वृक्षाला ज्यांनी,ज्यांनी जोपासलं मोठं व्हायला लावला आज त्यांच्या ऋणांतून अंशतः उतराई होण्याचा दिवस. त्याकाळातीलं स्पर्धक संस्था म्हणजे सगळ्यांनाच मनापासून वाटत होतं. कारण निनाद ने प्रत्येक सदस्याला भरभरुन दिलं. श्री. विजय मोंडकर ,श्री. प्रकाश गद्रे श्री.जयवंत देसाई, श्री. दत्ताजी तायडे, श्री. रघुनाथ मिरगळ, यांनी सर्व सदस्यांना जे घडवलं त्यामुळेच आजचे व्यावसायिक रंगभूमी,मालिका, सिनेमा, लेखन, दिग्दर्शन, तंत्रज्ञ ,या क्षेत्रात आम्ही सगळे भक्कम उभे आहोत. दोन वर्षा पासून कसा कार्यक्रम करावा याच्या चर्चा सुरु होत्या, आणि ती प्रत्यक्षात उतरली यात सर्वच सदस्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्याक्रम संस्थापकांचे हस्ते दीपप्रजवलीत करून केली गणेश वंदना सुरवात त्यानंतर जयंत पवार यांची गाजलेली एकांकिका मेला तो देशपांडे व गुण्या गोविंदा एकांकीका सादर केली .
संस्थापक व जेष्टा सोबत अनिल गवास यांनी घेतलेली चर्चासत्र कार्यक्रम पन खुप रंगला , तसेंच जयंत पवाराचे गाजलेले दोन नाटकांके वाचन केले अनिल गवास यानी सुंदर वाचन केले .
हेमंत भालेकर यांनी कविता व प्रकाश गंद्रे नी एक सुंदर गीत सादर केले..
या संस्थेतुन आज जे कलाकार मोठे झाले त्यांनीही आपला प्रवास अनुभव सादर अनिल, हा सोहळा अनौपचारिक करायचा हे ठरल्या नंतर निनादच्या कला प्रवासात भेटलेल्या निनादसाठी उभे राहीलेल्या सर्व व्यक्तींना सामावून घेणं त्यांचा सत्कार केला तसेच सोबतच्या प्रतिस्पर्धी संस्था होत्या त्यातल्या आविष्कार, उदयकलाकेंद्र, प्रयोग मालाड,माध्यम, सन्मित्र, अमर हिंद मंडळ . या संस्थांचा सत्कार केला कारण या संस्थामुळे निनाद स्पर्धेमधे वेगवेगळे प्रयोग करत अगदी निकोप स्पर्धा करीत होती.
विषेश सत्कार: नंदलाल रेळे,उल्हास सुर्वे, अनंत वालावलकर,सुरेश ड्रेसवाला, प्रदिप रांगणकर, प्रफुल्लं संघाणी, वर्दम मेकप,उमेश मुळीक, सितारम कुंभार, दादा पळ, या मंडळीनी निनादला त्या काळात सांभाळलं म्हणूनच ही येवढी वाटचाल सुखकर झाली. निनादचे काही सदस्य आज हयात नाही त्यांच्यापरिवाचाही सत्कार करण्यात आला.
निनाद चे संस्थापक श्री. विजय मोंडकर, श्री.जयवंत देसाई, श्री. प्रकाश गद्रे, श्री दत्ताजी तायडे, श्री. रघुनाथ मिरगळ, तसेच निनादच्या कला प्रवासात ज्यांच उल्लेखनीय योगदान असलेले जेष्ठं लेखक श्री. प्रेमानंद गज्वी , जेष्ठं अभिनेते,दिग्दर्शक श्री.सतिश पुळेकर यांचेही त्यांच्या सहधर्मचारीणी सोबतं दोघांचे ही सत्कार झाले. या सर्वांच्या सौभाग्यवतींना सन्मानपत्र व शाँल देवून सत्कार करण्यात आला. सर्व निनाद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कारण त्यांच्या शिवाय इतका प्रवास शक्य नव्हता. असा आगळा वेगळा 50 वा वर्धापनदिन गतकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांना सोबत घेवून, अनेक निनाद प्रेमीच्या सहकार्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विशेष आभार वसंत आंजर्लेकर, अनिल गवस,प्रदिप पाटील,नंदू सावंत,हेमंत भालेकर,रमेश पंड्या, शाम अधटराव, निलेश शेवडे, निखिल मोंडकर, मिलींद पाठक,चैताली मोंडकर पोतदार,विद्या कुलकर्णी जांभेकर , प्रकाश पेटकर,प्रकाश मोरये.खेळीमेळीच्या वातावरणात पु.ल. देशपांडे अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर मीनी थिएटर ) मधे साजरा झाला.