Home मुंबई अनं त्याने आपल्याच गुप्तांग मध्ये घातला स्टील रॉड

अनं त्याने आपल्याच गुप्तांग मध्ये घातला स्टील रॉड

236

जीव जाता जाता वाचला…

अमीन शाह

मुंबई , दि. ३१ :- मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांनी एका व्यक्तीवर अत्यंत किचकट शस्त्रक्रिया केली. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी आज एका 40 वर्षीय एका व्यक्तीचा जीव वाचवला. या व्यक्तीने त्यांच्या गुप्तांगामध्ये स्टीलची रिंग घातली होती. 3 मिलीमीटरच्या या रिंगमुळे त्याला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे त्याचा जीव देखील जाण्याची पाळी आली होती.

ही रिंग कापण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी ही रिंग कटरच्या सहाय्याने कापून रुग्णाची सुटका केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तिला कोणीतरी सांगितले हो ते की संभोगाचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर गुप्तांगावर रिंग घाला. यावर विश्वास ठेवून या व्यक्तीनी घरात सापडलेले एक कोनाकृती रिंग घातली. काही वेळाने ही रिंग घट्ट बसल्याने काही केल्या निघेना. काहीवेळाने रिंग गळून पडेल असे वाटले होते परंतु आठवडाभर या व्यक्तीने त्रास सहन केला. घरच्यांना सांगायची या व्यक्तीला लाज वाटतं होती.
काही दिवसांनी या व्यक्तीला लघवी होणे बंद झाले होते. त्यामुळे वेदना असह्य झाल्या. त्यानंतर या व्यक्ती जे. जे. रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्या व्यक्तीच्या गुप्तांगाच्या कातडीवर गँगरीन झालं आहे. नसा सुजल्याने ही रिंग घट्ट रुतली होती. त्यानंतर ही रिंग कापून काढण्यात आली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांने खासगी कंत्राटदाराकडून कटर मिळवून दिले. कटर मिळल्यानंतर मध्यरात्री ही रिंग कापण्यात आली.

रिंग कापून काढल्यानंतर डॉक्टरांनी गँगरीन झालेली त्वचा शस्त्रक्रियेने काढून टाकली. त्यानंतर काही दिवसांनी या व्यक्तीची प्रकृती सुधारली असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच असा जीवघेणा प्रकार करु नका असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला.