Home मराठवाडा चिमुकल्यानी बघितले मामाचे पत्र , लुटला मनसक्त मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये आनंद

चिमुकल्यानी बघितले मामाचे पत्र , लुटला मनसक्त मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये आनंद

129

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.३१ :- रोजी मुख्य पोस्ट ऑफिस येथे किट्स किडम प्रारयमरी शाळेतील चिमुकल्यानी डिजिटल पोस्ट ऑफिस पहाण्यासाठी व मामाचे कसे आपल्या पर्येंत पोहचत यांची माहिती त्यांच्या अभ्यास क्रमातील प्रोजेक्ट तयार करण्यासाठी शाळेला भेट दिली.

या चिमुकल्याना माहिती पूर्ण देण्यासाठी मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट मास्तर श्री.एम.बी. मकोडे यांनी विध्यार्थीना सर्व डाक विभाग योजना ची व पोस्ट ऑफिस चे कामकाज कसे चालते पत्र लेखन कसे लिहावे पत्र पाठवण्याचा पता कोणत्या बाजूला लिहावे व पत्र लिहिल्या नंतर ते प्रथम पत्र पेटीत टाकाल्या नंतर ते कुठे पोहचते यांची सविस्तर माहिती विध्यार्थीना देण्यात आली.
तसेच पोस्टाचे बँकेचे व्यवहार कसे करायचे,मनीड्रंर फॉर्म भरायचं मणिआडर कशी करायचे,तसेच माय स्टॅम्प म्हणजे काय माय स्टॅम्प तयार करण्यासाठी कोणता फॉर्म भरून दयावा लागतो,बाहेर देशात जाण्यासाठी पासपोर्ट कसे तयार करतात, आधार कार्ड कसे तयार केले जाते, आशा विविध प्रकारच्या डिजिटल पोस्ट ऑफिस च्या योजनांची माहिती चिमुकल्याना देण्यात आल.

डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत आल्या पासुन पोस्ट ऑफिस हे प्रेरणा स्थळ बनले आहे अनेक शाळेतील विध्यार्थी पोस्ट ऑफिस ला भेट देत आहेत. पोस्ट ऑफिस स्वच्छता ठेवल्या जात आहे. सर्व कर्मचारी डाक ग्रहांना आदराने बोलत आहेत या मुळे मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये दररोज हजारोच्या संख्येने ग्राहक डाक विभागात पैशाची ठेवी जमा करीत आहेत. तसेच पोस्ट ऑफिस परिसरात व पोस्ट ऑफिस मुख्य दर्शनी विविध प्रकारच्या योजनांच्या डिजिटल जाहिरात लावून ग्रहांकाना बोलके चित्र दिसत आहेत.
हे सर्व नांदेड टीम च्या सहकार्यमुळे झाले असल्याचे बोले जात आहे.