Home विदर्भ इन्सपायर विज्ञान विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

इन्सपायर विज्ञान विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

221

कारंजा – प्रतिनिधि

वाशिम , दि. ३१ :- प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. वाशिम, शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा,विज्ञान अध्यापक मंडळ,वाशिम व ब्लू चिप कॉन्वेंट व ज्युनि.कॉलेज अॉफ सायन्स कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट कारंजा येथे दि. ३० जानेवारी रोजी अकोला बुलडाणा व वाशीम इन्सापायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले. प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वाशीम जिल्हा परीषदेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, अध्यक्ष म्हणून ब्ल्यु चिप कॉन्व्हेंटचे अध्यक्ष अशोक इन्नाणी तर प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हा परीषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, शिक्षण उपनिरीक्षक आकाश अहाळे , एन.आय. एफ.फौंडेशनचे विशाल वाघमारे,कारंजा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी सुरेश अघडते, मुख्याध्यापक शिक्षक संघ विदर्भ प्रतिनिधी मंगेश धानोरकर,विभागिय विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भास्कर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रदिप अढाव, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय उपाध्यक्ष विजय भड,सागर दुर्गे, कानकीरड,अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ प्रतिनिधी धम्मदिप इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश विभागीय उपाध्यक्ष विजय भड यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केला.जि.प.अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फित कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व उद्घाटनीय भाषणात सर्वसामान्यांच्या अडचणीवर विज्ञानाचे शोध उपयोगी ठरत असल्याने विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.वाशिम जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
रविंद्र भास्कर यांनी इंस्पायर प्रदर्शनी व इतर विज्ञान प्रदर्शनीतला फरक उपस्थिताना समजाउन सांगितले. अध्यक्षीय भाषणात अशोक इन्नाणी यांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करुन बालशास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.
सदर प्रदर्शनीमधे वाशिम, अकोला व बुलडाणा येथिल बालवैज्ञानिक सहभागी झाले आहेत. उद्घाटनीय कार्यक्रमाचेे सुत्रसंचालन शाम इंगोले यांनी तर आभार शारदा रोतेले यांनी मानले.प्रदर्शनीच्या यशस्वितेकरीता ब्ल्यु चिप कॉलेज कारंजा,वाशीम जिल्हा व कारंजा तालुका अध्यापक मंडळाचे सदस्य सहकार्य करीत आहे.