Home सोलापुर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत घरकुल योजना…!!

विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत घरकुल योजना…!!

279

शेवटची मुदत आज असल्याने नागरिकांची दमछाक…

मुदतवाढ मिळण्याची मागणी

अक्कलकोट – सतीश मनगुळे

अक्कलकोट , दि. ३१ :- विमुक्त जाती, भटक्या जमाती, या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसहात योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल योजना सन२०१९-२० अंतर्गत घरकुल योजनेकरिता अक्कलकोट तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत या योजनेच्या जी आर मधील नमूद सर्व जातींच्या कडून अर्ज मागविण्यात आले असून, त्याची मुदत उद्या दि.३१/०१/२०२० ही अंतिम असल्याने, अडचणी निर्माण होत आहेत.
ह्या फॉर्म स्वीकारण्याची मुदत २३ ते ३१ जानेवारी असल्याने आठच दिवसात लाभार्थ्यांनी कागदपत्रे कशी जुळवाजुळव करायची अशा प्रश्न तालुक्यातील लाभार्थ्यांना पडलाय….? जातीचा दाखला काढायला शासकीय नियमानुसार ४५ दिवस, अल्पभूधारक १५ दिवस, सर्कल चौकशी ३ दिवस, टपाल मध्ये २ दिवस ,…. अशी शासनाने ठरवलं नियम असून, इथे जी आर मध्ये मात्र ८ दिवस मुदत आहे. मग कशी काय कागदपत्रे जुळवाजुळव करायची….? एकतरी अशिक्षित मंडळी ग्रामीण भागात जास्त असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
यासर्व बाबतीत जिल्हा प्रशासनाने या घरकुल योजनेची मुदतवाढ करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांतुन होत आहे.