कारंजा ( लाड ) प्रतिनिधि
वाशिम / मंगरूळपीर , दि. ३० :- अकोला ते मानोरा राज्य महामार्गाच्या कामात नगर परिषद मंगरूळपीर च्या पाणी पुरवठा विभागाच्या जल वाहीण्या क्षतीग्रस्त झाल्याने हजारो गँलन लिटर पाण्याचा अपव्यय होत असुन यामुळे नागरीका सह वाहतुकीला अर्थडा निर्माण झाला असुन नगर परिषदेच्या कामचलाऊ धोरणामुळे व कंत्राटदार स्वामी समर्थच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांना होत आहे दुषित पाणी पुरवठा,तरी याकडे अद्याप पर्यंत सबंधितांचे लक्ष नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे याला जबाबदार असनाऱ्यावर तातडीने कार्यवाही करा अशी नागरीकातुन चर्चा होत आहे.
अश्या पाणी गळती मुळेच नगरवासीयांवर येत्या काळात जल संकट ओढावण्याची चिन्हे, तर या कामात कुठलेच दुरहेतु जोपासण्यात आले नाही. राज्य महामार्गाच्या कामात कंत्राटदार यांनी निक्रुष्ठ दर्जाच्या ( पिव्हीसी) पाईप जल वाहीण्यांना जोडल्यात.तर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे सबंधीत यांनी या बाबत हरकत घेतले नसल्याने मनोपल्ली कामे करून घेण्यात येत आहे. तर आपल्या सोईनुसार न प पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी हे कंत्राटदार यांचे समोर नतमस्तक होऊन शहराचे ऊर्वरीत वाटोळ करण्यात मग्न असल्याचे खुद शहरातील नागरीक सांगत आहेत. या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असुन.भविष्यात असे प्रसंग उद्भवु नये या करीता शहरातील जलवाहीन्यांचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. तर क्षतीग्रस्त झालेल्या जलवाहीन्या तातडीने दुरूस्त कराव्या तो पर्यंत पाणी पुरवठा करू नये असेही नागरीकांचे म्हणने आहे.