Home पश्चिम महाराष्ट्र लाखो रुपये किमतीचा कुत्रा चोरणाऱ्यास अटक

लाखो रुपये किमतीचा कुत्रा चोरणाऱ्यास अटक

22
0

अमीन शाह

पुणे , दि. ३० :- डॉग ट्रेनरचं दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचे लासपसो जातीचे कुत्र चोरी गेलं आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात निरंजन आनंद कुलकर्णी (वय 34,रा. धनकवडी) व अमोल मारूती चव्हाण (वय 35, रा. अपर इंदिरा नगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबात सचिन अ‍ॅन्थॉनी (वय 26, रा.निंबाळकरवाडी, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे डॉग ट्रेनर आहेत. त्यांच्याकडे विविध जातींची कुत्री आहेत. त्या ठिकाणी ते कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. आरोपी देखील पूर्वी याच परिसरात राहत होते. त्यामुळे त्यांना या परिसराची माहिती होती. त्यातूनच त्यांनी लासपसो जातीचे 2 लाख 80 हजारांचे कुत्रे चोरी करून पोबारा केला. होता
या दरम्‍यान चोरी करत असताना तेथील काही लोकांनी या दोघांना पाहिले. त्यातूनच त्यांचे चोरीचे बिंग फुटले. यावरून या दोघांविरूध्द पोलिस स्‍टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, या चोरीचा पुढील तपास हवालदार के. आर. बढे करीत आहेत.

दोघांना अटक ,

या प्रकरणी पोलिसांनी आज पोलिसांनी निरंजन आनंद कुलकर्णी , अमोल मारुती चव्हाण , रा , इंद्रा नगर पुणे या दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे ,

Unlimited Reseller Hosting