महत्वाची बातमी

तीन दिवस राहणार बँका बंद…!

अमीन शाह

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार (दि. ३१) आणि शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) दोन दिवस संपाची हाक दिली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस संप आणि रविवारी सुट्टी असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांचे कामकाज तीन दिवस ठप्प होणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. बँक कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. संपास जोडूनच रविवार आल्याने आठवडाअखेर सलग तीन दिवस बँकां बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिक, व्यापार्‍यांसह ग्राहकांची चांगली पंचाईत होण्याची शक्यता आहे.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752