Home मराठवाडा मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजनाचा लाभ घ्यावा – संजय...

मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजनाचा लाभ घ्यावा – संजय आंबेकर

184

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

लिंबगाव नांदेड , दि.२९ : डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना जनतेच्या दारी हा कार्यक्रम दि. २८ रोजी आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास मार्गदर्शन करताना श्री.आंबेकर म्हणाले की मुलींच्या भविष्यासाठी भारत सरकार ची योजना सुकन्या समृध्दी खाते योजना आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलींचे भविषातील स्वप्न साकार करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा.
असे भाषणात बोलत होते.या कार्यक्रमाला गावातील सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष, तळणीचे सरपंच उपस्थित होते.
साहयक डाक अधीक्षक श्री.संजय आंबेकर यांनी सरपंच यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. तर आंबेकर यांचा सत्कार लिंबगाव चे शाखा डाकपाल यांनी शाल व श्रीफळ देऊन केला. पुढे बोलताना आबेकर म्हणाले की सुकन्या समृध्दी खाते योजनेला सर्वात जास्त व्याजाची तरतूद करण्यात आली आहे. व्याजदर ८.४ चक्रवाढ एकवीस वर्ष आहे यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी आव व वडिलांना कर्जबाजारी होण्याची गरज नाही. एकवीस वर्षाला मुलीला एक रक्कमी रकम मोठीं मिळते असे आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले आहे.
या मेळाव्यास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.