Home बुलडाणा पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त बजरंग बलीला दुग्धाअभिषेक!तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय...

पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त बजरंग बलीला दुग्धाअभिषेक!तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

293
0

 

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-अंढेरा येथे स्थानिक सेवानगर येथील तांडा वस्तीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांचे विश्वासु तथा एकनिष्ठ विनोदभाऊ चव्हाण तथा मित्र मंडळ यांनी भरगच्च कार्यक्रम आयोजन केले होते.यामध्ये सकाळीच सेवानगर येथील बजरंगबलीच्या मंदीरात दुग्धाअभिषेकासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.यावेळी बजरंग बलीचे विधीवत पूजन करून सर्वाच्या हस्ते बजरंग बलीला दुग्धाअभिषेक करण्यात आला .

यावेळी मंदीर हारा फुलांनी सजवण्यात आले होते.यावेळी कोरोनाचे संकट कायमचे जाऊ दे असे साकडे विनोदभाऊ चव्हाण यांनी घातले.तसेच कोरोना काळात शाळा बंद असल्याने सेवानगर जि.प.शाळेतील सर्वच ९८ गरजु मुला-मुलीनां वही,पेन यांच्या वाटप करण्यात आले.
यावेळी विष्णू राठोड, गणेश राठोड, बाळु राठोड, आकाश चव्हाण, विशाल राठोड, प्रदिप राठोड, रविंद्र राठोड, साळवे सर, मोरे सर, मनोज चव्हाण, स्वप्नील राठोड, रोहिदास राठोड, सुनिल सरदार, येगोश राठोड, चिग्या चव्हाण, विलास राठोड, विनोद चव्हाण, तथा जि.प.शिक्षक व सेवानगर येथील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleगुढीपाडव्याचे नवीन वर्ष भारतीय कामगार सेनेने ग्रँड हयात हया पंचताररांकित हॉटेल मधे साजरे केले
Next articleमाहूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ चे काम महामार्ग नियमाप्रमाणे करावे सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना बहुपक्षीय निवेदन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.