के. रवि ( दादा )
मुंबई – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पण हे मराठी नववर्ष सेलिब्रेशन आता पंचतारांकित हॉटेलमध्येही होत आहे. भारतीय कामगार सेना आणि हॉटेल व्यवस्थापनातर्फे मुंबईतील सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये नववर्षाची गुढी साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय महाराष्ट्र’च्या गजरात कार्यकर्त्यांचा आवाज शिकागोपर्यंत पसरला.

भारतीय कामगार सेनेचे संघटक व सचिव मनोज धुमाळ यांनी या शुभप्रसंगी सांगितले की, भारतीय कामगार सेनेतर्फे गेल्या सात वर्षांपासून ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुढी उभारण्यात येत आहे.
हा कार्यक्रम अधिक उजळ करण्यासाठी शिवसेना नेते-खा. संजय राऊत, भारतीय कामगार सेना अध्यक्ष. खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री एड. अनिल परब एचआर सुलभ सुरी, वित्त संचालक अर्पित उपाध्याय, ज्युपिटर हॉटेलचे अध्यक्ष अमित सराफ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष प्रशांत नाईक, अभय प्रभू, सिद्धेश पांढरकामे, संदेश परब, कुश गवस, संजय पाटे, प्राजक्ता तेली, हीना शेख आदींनी पुढाकार घेतला.

