Home सोलापुर शिरवळ मुलांची शाळा बनली स्मार्ट शाळा

शिरवळ मुलांची शाळा बनली स्मार्ट शाळा

246

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. २८ :- शिरवळ येथील जि प प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे दि २५/०१/२०२० रोजी स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २२व्या स्मृतिदिनानिमित्त शिरवळ केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने व शिरवळ गावचे सरपंच बसवराज तानवडे व केंद्रीय मुख्याध्यापक व पुणे विभागीय शिक्षक समितीचे अध्यक्ष दयानंद कवडे सर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत शिरवळ तर्फे १४ व्या वित्त आयोगातून शिरवळ मुलांच्या शाळेतील इ,१ली ते इ,७वी च्या प्रत्येक वर्गात स्मार्ट टी व्ही बसवण्यात आले आहे .

त्याचे उदघाटन जि. प. सोलापूरचे सदस्य आनंद तानवडे यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. स्मार्ट टी, व्ही मुळे प्रत्येक विध्यार्थी , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दृक आणि श्राव्य या दोन्ही पद्धतीने अतिशय आवडीने आपल्याला हवा तो अभ्यासक्रम हाताळू शकतो. युट्युब तसेच गुगल या तंत्रज्ञानाचा वापर करून, आता विद्यार्थी आपापल्या या वर्गाचा अभ्यासक्रम डाऊनलोड करून ते बघू शकतील आणि ऐकू शकतील ,त्यामुळे विध्यार्थी व शाळा स्मार्ट बनण्यास मदत होईल. असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.यावेळी गावचे तंटामुक्त अध्यक्ष श्री आप्पाशा देवकर ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री संगप्पा कुडले व सदस्य ,ग्रामसेवक , सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाफर मुल्ला सर व दोन्ही शाळेतील शिक्षक व शिक्षिका आणि विध्यार्थी तसेच “रॅक्सन” या स्मार्ट टीव्ही कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम कारंजे उपस्थित होते.