मायणी – सतीश डोंगरे
सातारा , दि. २८ :- सध्याचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे या युगात ज्योतिषांनी विज्ञानाची सांगड घालावी पाहिजे ग्रहमैत्री एक नाडी दोष या संकल्पना कालबाह्य झाले आहे प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे कुंडल्या अभ्यासणे घेणे गरजेचे आहे जातकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अभ्यासपूर्ण दिले पाहिजे लग्न म्हणजे ज्योतिषशास्त्रात देह आहे याचा विचार करणे गरजेचे आहे असे मत ज्योतिष शास्त्राचे सखोल अभ्यासक आँ. श्रीधर कुलकर्णी यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले ज्योतिष मंडळ सातारा आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ श्रीराम देव होते प्रसंगी ज्योतिष्य गोविंद कोष्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय देऊन त्यांनी ज्योतिषशास्त्रात गेल्या वीस वर्षात केलेल्या कार्याचा धावता आढावा घेतला आपल्या भाषणात कुलकर्णी पुढे म्हणाले राहू-केतू हे अदृश्य ग्रह आहेत मानवी शक्तीच्या ताकती पेक्षा अदृश्य ताकद जास्त आहे यासाठी पंचक स्थान हे उपासना स्थान आहे .
मनुष्याच्या जीवनातील स्त्री हे अज्ञात शक्ती आहे स्त्री हा प्राण आहे ही पुरुषाची अर्धांगिनी शक्ती आहे या गोष्टीचाही भविष्य कार त्यांनी विचार करावा असे सांगितले अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट श्रीराम देव म्हणाले ज्योतिष मध्ये सर्वांना आकर्षण असते परमेश्वराच्या इच्छेने घडवलेले जाते हे भविष्य यासाठी भविष्य पाहण्याची नजर तर्कशुद्ध सकारात्मक समायोजित सुसंगत सुनियोजित असणे गरजेचे आहे असे सांगितले या कार्यक्रमास सौ सपना पवार सौ कासट मॅडम ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके विनायक जोशी उमेश जंगम कु.पूजा तांगडे कु.स्नेहल कदम अहिरेकर डॉक्टर रमेश दर्भे पोपट बाळींबे तसेच परिसरातील अनेक जोतीष जाणकार उपस्थित होते शेवटी सपना पवार यांनी आभार मानले.