पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नांदेड , दि. २७ :- प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड पोस्ट ऑफिस मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य पोस्ट मास्तर श्री. माकोडे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाक अधीक्षक नांदेड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहयक डाक अधीक्षक संजय आंबेकर हे होते.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना डाक अधीक्षक यांनी म्हणाले की डाक विभागातील सर्वचं कर्मचारी या आपण आधिकारी आहे म्हणुन डाक विभागाचे दिलेले उद्दिष्टे पूर्ण करावे कारण नांदेड टीम चागले काम करीत आहेत.
या कामाची पावती म्हणून जनतेने डाक विभाग योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मदत म्हणून गरीब,वंचीत,दारिद्रय रेषेखालील शून्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी सुकन्या समृध्दी खाते योजना पुस्तक भेट देण्यासाठी शिराढोन येथील उप सरपंच यांनी गावातील जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० कालावधी मध्ये जन्म घेतलेल्या मुलीचे पहिला हापता भरूनव सुकन्या समृध्दी पुस्तक मुलींच्या आई व वडिलांना भेट दिली तर किनवट तालुक्यातील जि. प.सदस्य श्री. विशाल जाधव यांनी एक हजार गरीब मुलीच्या नावे सुकन्या समृध्दी हाते उघडून मुलींच्या आई व वडिलांना मुलीचे कन्यादान म्हणून भेट देण्याचे आश्वासन दिले. महिला याही पेक्षा एक पाऊल पुढे सर्व क्षेत्रात टाकत आहेत किनवट तालुक्यातील सारखणी गावातील आदिवासी महिला सरपंच यांनी मकरसंक्रांतीचे वाण म्हणून सुकन्या समृध्दी खाते पुस्तक गरीब मुलीच्या आईला देऊन ओटी भरवली आहे हा आगळावेगळा प्रयोग जनते मधून होत आहे.नांदेड टीम ची कामाची पावती आहे आणि डाक विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले.
नांदेड डाक टीम मधील ग्रामीण डाक जीवन विमा योजना, सुकन्या समृध्दी खाते योजना, आधार कार्ड दुरुस्ती, अटल पेन्शन योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते या योजनेत सर्वात जास्त खाते उघडणारे कर्मचारी मार्केटिंग एक्सिकेटीव्ह, सब पोस्ट मास्तर, डाक साहयक, ग्रामीण डाक सेवक यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना डाक अधीक्षक यांच्या हस्ते आकर्षक भेट व पुरस्कार पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या उत्कृष्ट पुरस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय आंबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.व्ही. एम.पदमे यांनी केले.