
हनिफ शेख ,
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा नंदई गावात सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे . ३५ वर्षीय विवाहितेच्या घरी तिचा बहिणीचा दीर पाहुणा म्हणून आला होता .सोबत त्याचा मित्रही होता . या दोघांनी विवाहितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला .व याचे विडिओ चित्रीकरण ही केले करण्यात आलेले विडिओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मित्र एकटा येऊन तिच्यावर अत्याचार करू लागला अत्याचार असहाय झाल्याने अखेर विवाहितेने अंढेरा पोलीस ठाण्यात या दोघां विरोधात तक्रार दाखल केली दाखल तक्रारी वरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ज्ञानेश्वर आसाराम कनखरे ३५ , रा . आमगव्हाण , हदगाव , जि . नांदेड व फकीरा किसनराव देशमुख ३८ , रा . उंचेगाव , ता . हदगाव , जि . नांदेड अशी आरोपींची नावे आहेत . या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार ३५ वर्षीय विवाहित महिलेची . बहीण नांदेड जिल्ह्यातील आमगव्हाण येथे दिलेली आहे . तिचा बहिणीचा दीर ज्ञानेश्वर कनखरे हा गेल्यावर्षी दिवाळीत धोत्रा नंदई येथे आला होता
यावेळी विवाहितेचा पती बाहेर गेलेला होता . ही संधी साधून ज्ञानेश्वरने तिच्यासोबत जबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले . त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ज्ञानेश्वर त्याचा मित्र फकीरा याला घेऊन धोत्रा नंदई येथे आला . विवाहितेचा पती बाहेर गेल्याची संधी साधून आधी ज्ञानेश्वर व नंतर फकीराने आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व याचे व्हिडिओ चित्रीकरण ही केले . घटना कुणाला सांगितल्यास व्हिडिओ वायरल करून बदनामी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली .
या घटनेचा पुढील तपास थानेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वसाडे , पो , हे ,काँ विलास काकड हे करीत आहेत ,











































