Home विदर्भ Pusad लोकन्यायालयात १० कोटी ५१ लाखाची तडजोड

Pusad लोकन्यायालयात १० कोटी ५१ लाखाची तडजोड

130

राष्ट्रीय लोकअदालतीत २५१ प्रकरणांचा निपटारा

लोकांमध्ये आपसी तडजोडीची भावना जागृत होण्यासाठी लोकन्यायालयाचे आयोजन : न्यायधीश व्ही.बी. कुलकर्णी, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती

यवतमाळ / पुसद न्याय पालिकेवरील खटल्यांचा मोठा भार कमी करण्यासोबतच लोकांमध्ये आपसी तडजोडीची भावना जागृत होण्यासाठी लोकन्यायालयाचे आयोजन करीत असतो. लोकन्यायालयात आपसातील समझोत्यातून न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. यातून वेळ, पैसा वाचतो. त्यामुळे पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या कामात अधिक सहभाग घेतला पाहिजे अशा प्रकारचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत पक्षकार, वकील व न्यायाधीश मंडळी पत्रकार, पोलीस यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच आजचे लोकन्यायालय यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल आभार व्यक्त करीत या लोकन्यायालयात तडजोड न झालेले प्रकरण पुढील लोक न्यायालयात ठेवून आपसातील वाद संपुष्टात आणावे असे आवाहन सुद्धा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक व्ही.बी. कुलकर्णी यांनी केले आहे.
पुसद तालुका विधी समिती अंतर्गत जिल्हा न्यायाधीश १ व्ही.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पुसद न्यायमंदिरात शनिवार ११ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व प्रकरणे, दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे,धनादेश अनादर प्रकरणे व किरकोळ फौजदारीच्या एकूण ३ हजार ६८८ प्रकरनापैकी २५१ प्रकरणे समझोत्याने व १० कोटी ५१ लाख रुपयांचे तडजोड राशीने निपटारा करण्यात आला.
लोक न्यायालय चालविण्यासाठी ६ पॅनेल्स गठित करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश क्रमांक – १ व्ही. बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश २ बी.वाय.फड, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर श्रीमती के. एम. एफ. खान, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एन. नाईक,  सह दिवाणी न्यायाधीश कनिष्‍ठ स्‍तर एन.जी. व्यास, सहदिवाणी न्यायाधीश  कनिष्‍ठस्तर ए.डी. मारगोडे, सहदिवाणी  न्‍यायाधिश कनिष्‍ठस्तर एम.बी.सोनटक्के, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्‍ठस्तर पी.आर.फुलारी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्‍ठस्तर जी.बी. पवार, सहदिवाणी न्यायाधीश  कनिष्‍ठस्तर व्ही. एस. वाघमोडे, सहदिवाणी न्यायाधीश  कनिष्‍ठस्तर डी. बी. साठे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या पॅनल्सवर  वकील संघाचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यात ॲड.महेश पाठक,ॲड. आदित्य माने,
ॲड. अश्विनी जाधव,ॲड. अर्चना मोरे,ॲड. सुष्मिता रोकडे,ॲड. राजेंद्र शिंदे,ॲड. केशव राठोड प्रा.डॉ. बी. आर. देशमुख,एस एस पाटील, प्रा. दिनकर गुल्हाने, बाबासाहेब गाडगे, महेश काळे,दिनेश कदम, यांनी काम पाहिले. वकील संघाचे अध्यक्ष डी. डी. पवार, ॲड. विवेक टेहरे,ॲड.अतुल चिद्दरवार, यावेळी उपस्थित होते.
या राष्ट्रीय अदालतीच्या यशासाठी न्यायालयीन कर्मचारी जिल्हा न्यायालय अधीक्षक व्ही. आर. बंगाले, वरिष्ठ लिपिक रवी पेटकर, निलेश भोयर, प्रवीण कोयरे, एस.पी. ददगाळ व पोलीस सुधाकर राठोड, शेखमकसुद, अतुल दातीर व न्यायालयीन कर्मचारी, सर्व बँक प्रतिनिधी व शाखा व्यवस्थापक यांनी सहभाग घेतला. 
न भांडता एकोप्याने राहण्याची लोकन्यायालय शिकवण देते : जिल्हा न्यायाधीश क्रमांक- 2 बी. वाय.फड

भांडण हा मनुष्याच्या प्रवृत्तीचा जरी भाग असला तरी भांडणे – वाद निर्माण झाली तरी ती आपापसात शांततेने, विचार विनिमय करुन सोडवायची असतात आणि भविष्यात कुठलेही वाद निर्माण होऊ नये यासाठीचे आपले कर्तव्य पार पाडायचे असतात. एक माणूस म्हणून भांडायचं नसतं तर एकोप्याने राहायचं असतं हीच शिकवण लोकन्यायालयाची आहे. त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा जिल्हा न्यायाधीश क्रमांक -दोन बी. वाय. फड यांनी लोकन्यायालयाच्या कार्यक्रमातून बोलून दाखवीली.