Home बुलडाणा पती पत्नीचा वाद झाला अन , विपरितच घडलं ???

पती पत्नीचा वाद झाला अन , विपरितच घडलं ???

669

पती ने केली पत्नीची निर्घृण हत्या

पतीस अटक ,

सचिन खंडारे ,

साखरखेर्डा ,जी , बुलडाणा

शेती विकण्यास विरोध केल्याने पतीने गाढ झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घातला . यात तिचा जागीच मृत्यू झाला . ही , घटना आज , ११ डिसेंबरच्या पहाटे साडेचारच्या सुमारास साखरखेर्डा ( ता . सिंदखेड राजा येथे घडली . मृतक विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला सकाळीच अटक केली . सुनिता संजय गवई ( ३६ , रा . साखरखेर्डा ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून , संजय पांडुरंग गवई ( ४२ ) असे तिच्या खुनी पतीचे नाव आहे . या प्रकरणात समाधान मधुकर सरकटे ( २८ , रा . अंत्री खेडेकर ता . चिखली ) यांनी तक्रार दिली .
भीमनगर येथे राहणाऱ्या संजय पांडुरंग गवई याचा विवाह अंत्रीखेडेकर येथील मधुकर सरकटे यांची व्दितीय कन्या सुनिता उर्फ गोदावरी हिचे सोबत 19 वर्षापूर्वी थाटामाटात संपन्न झाला . लग्नानंतर आरोपी संजय हा किरकोळ कारणावरून सुनिता हिचा छळ करायचा . गेल्या काही दिवसांपासून सुनिता ही माहेरी गेली होती काल माहेरहून परत आल्यावर शेती विकण्याचा तगादा लावला शेती विकण्यास सुनिताने विरोध केला हा राग अनावर झाल्याने सुनिता ही झोपेत असताना संजयने मसाला वाटण्याचा पाटा तिच्या डोक्यात टाकून त्याची क्रुरपणे हत्या केली . घटनेनंतर आरोपी संजय हा पोलीस ठाण्यात हजर होवून केलेल्या कृत्याची कबूली दिल्या नंतर समाधान सरकटे याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे हे करीत असून या प्रकरणी आरोपी संजय यास अटक करण्यात आली आहे .