
स्पृश्यास्पृश्य भेद
मानत होते खुळे
प्रस्थापीत जाळ्यां
फसत होते भोळे
आंदोलन बाबांचे
महाडचवदार तळे
पाणी सर्वां समान
रहस्य खरेचं कळे
असह्य तो अन्याय
साहेब ही तळमळे
साखळीमुक्त सारे
झाले डाॅक्टरांमुळे
तेव्हा लावले रोपटे
आतामिळती फळे
सोसल्या त्याझळा
फुलले सुंदर मळे
प्रकाश खुले सर्वत्र
दिवस सरले काळे
धन्य रे महामानवा
हातआपसूक जुळे
महूस्थान चैत्यभूमी
रक्तधमन्या सळाळे
तुझा विचार सुगंध
आसमंतात दळाळे
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.











































